Team Agrowon
राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.
आज (ता. ११) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान हवामान विभागाने दिला आहे.
उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ११) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यातच सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सांगली येथे ३६.३, सातारा येथे पारा ३५.७ अंशांवर आहे.
किमान तापमानाचा पारा कमी अधिक होत असून, निफाड आणि जळगाव येथे पारा १० अंशांच्या खाली आहे.
उर्वरित राज्यात १० ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. आज (ता. ११) तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.