Farm Worker Schemes: शेतमजूर, सलग्न क्षेत्रातील मजुरांसाठी येणार योजना

Maharashtra Labour Department: राज्यातील ९५ लाख शेतमजूर व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांसाठी धोरण आणि निधीचा स्रोत निश्‍चित करण्यासाठी कामगार विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
Mahakamgar Vibhag
Mahakamgar VibhagAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील ९५ लाख शेतमजूर व शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांसाठी धोरण आणि निधीचा स्रोत निश्‍चित करण्यासाठी कामगार विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती शेतमजूर व कृषी सलग्न क्षेत्रातील कामगारांचे निकष निश्चित करून त्यांना विविध योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी राज्य सरकारला शिफारस करणार आहे.

राज्यातील विविध उद्योग आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार आहेत. लेबर ब्यूरो ऑफ चंडीगड यांनी जाहीर केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात तीन कोटी ७० लाख असंघटित कामगार आहेत. या कामगारांना मुख्य प्रवााहात आणण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे

Mahakamgar Vibhag
Women Unpaid Labor : इतिहासातील सगळ्यात मोठी चोरी...

तसेच ई-श्रम पोर्टलही तयार करण्यात आले आहे. त्यावर असंघटित कामगारांची नोंदणी करता येते. या घटकांकरिता विविध उद्योग व्यवसाय क्षेत्रातील ३९ क्षेत्रे निश्‍चित केली असून, ३४० प्रकारच्या कामांची निश्‍चिती करण्यात आली आहे. या कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याच्या दृष्टीने ३९ आभासी मंडळेही स्थापन केली आहेत. यात कृषी क्षेत्राशी सलग्न आणि शेतमजुरांसाठी कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यासाठी तसेच नियम ठरविण्यासाठी आणि निधीचा स्रोत ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Mahakamgar Vibhag
Agriculture Labor : सालगड्यांचा मेहनताना आखजीला ठरणार ; शेती तोट्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण

या समितीचे अध्यक्ष कामगार विभागाचे प्रधान सचिव असतील तर कामगार विभागाचे उपसचिव सदस्य सचिव असतील.या समितीत सहकार, कृषी, रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव, असंघटित कामगार विकास आयुक्त, कृषी आयुक्त, कामगार आयुक्त, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय बालनिधीचे राजी नायर, अल्पा वोरा, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रतिनिधी, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेचे प्रतिनिधी सदस्य असतील.

ही समिती एक महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. ई-श्रम पोटलवर नोंदीत असलेल्या अंसघटित क्षेत्रातील कामगारांना सध्या मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ, त्यांची संख्या, डेटा निश्‍चित केला जाणार असून, राज्य सरकारमार्फत लागू करावयाच्या योजनांबाबत शिफारस करण्यात येणार आहे. शेतमजूर आणि कृषी क्षेत्राशी सलग्न असलेल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी योजनांची शिफारस ही समिती करेल. तसेच या योजनांसाठी निधीचा स्रोत काय असेल याचीही शिफारस करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com