Agriculture Scam: चार कोटींच्या अवजारे वाटपात घोटाळा

Agricultural Equipment Bank: चंद्रपूरचे वादग्रस्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सादर केलेल्या चार कोटी रुपयांच्या कृषी अवजारे बॅंक प्रकल्पाबाबत आमदार अभिजित वंजारी यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत.
Agriculture Equipment
Agriculture EquipmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : चंद्रपूरचे वादग्रस्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सादर केलेल्या चार कोटी रुपयांच्या कृषी अवजारे बॅंक प्रकल्पाबाबत आमदार अभिजित वंजारी यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्यांनी यांसदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. श्री. तोटावार यांनी केंद्र व राज्याच्या निकषाप्रमाणे प्रस्ताव सादर केला नाही, प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेमधील अटी व शर्तींचे उल्लंघन झाले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार वंजारी यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्हा वार्षिक विकास योजना व पंतप्रधान खनिज क्षेत्र कल्याण योजना या दोन योजनांंमधील निधी लाटण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद प्रस्ताव तयार केल्याचे या तक्रारीतून स्पष्ट होते आहे. संजय आकरे, तुषार पडगिलवार यांनी यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. तोटावार यांनी चार कोटी रुपयांचा एक प्रस्ताव तयार करीत त्याला स्वतःच तांत्रिक मान्यता दिली व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.

Agriculture Equipment
Agriculture Equipment Registration: कृषी अवजारे, यंत्रांना आता नोंदणीची सक्ती

त्यात शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांना १०० टक्के अनुदानावर अवजारे बॅंक योजना राबविण्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्याच दिवशी प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण आदेशदेखील दिले. मात्र तक्रारदार श्री. आकरे यांच्या म्हणण्यानुसार, तोटावार यांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकारच नाहीत. विशेष म्हणजे ही योजना सामूहिक लाभाची असूनही श्री. तोटावार यांनी जाणीवपूर्वक ही योजना कागदोपत्री वैयक्तिक लाभाची म्हणून भासवली.

अवजारे बॅंक वाटप ही योजना सामूहिक लाभाची आहे. त्यासाठी जागेची उपलब्धता असणे बंधनकारक आहे. मात्र ही अट झाकण्यासाठी संभ्रम निर्माण करीत ही योजना वैयक्तिक लाभाची असल्याचे भासवून दिशाभूल करीत प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. मुळात, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मान्यता देताना संबंधित अवजारे इतर योजनेत समाविष्ट नसावीत, अशी अट टाकली आहे.

परंतु श्री. तोटावार यांच्या प्रस्तावातील सर्व औजारे राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव रद्दबातल ठरतो. प्रस्तावित योजनेला प्रशासकीय मान्यता २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी असताना आर्थिक वर्ष संपल्यानंतर देखील क्षेत्रीय स्तरावर योजना राबविली गेली नाही. त्यामुळे या योजनेची चौकशी करावी व तोपर्यंत योजनेला स्थगिती द्यावी, अशी मागणी श्री. आकरे यांनी केली आहे.

Agriculture Equipment
Maharashtra Agriculture Scam: ‘कृषी’तील गैरव्यवहारांचे सविस्तर अहवाल द्या

दरम्यान, श्री. पडगिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून श्री. तोटावार यांनी तयार केलेल्या प्रस्तावातून वाटण्यात येणाऱ्या निविष्ठा मुळात इतर योजनेच्या निविष्ठा किटमध्ये यापूर्वीच समाविष्ट असल्याचे दाखवून दिले आहे. श्री. तोटावार यांनी खोटी माहिती देत प्रस्तावाला मंजुरी घेतली. तसेच निविष्ठांची खरेदी सरकारी यंत्रणेऐवजी खासगी ठेकेदारांकडून केली. त्यामुळे या योजनेत निधीचा अपहार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी श्री. पडगिलवार यांनी केली आहे.

आमदार वंजारी यांनी आपल्या तक्रारीसोबत श्री. आकरे व श्री. पडगिलवार यांच्या पत्राच्या प्रती जोडल्या असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तक्रारदारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

आमदार राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर

श्री. तोटावार यांनी भात व हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी निविष्ठांबाबत प्रस्ताव देताना आमदार राम शिंदे यांचा खोटा संदर्भ देत दिशाभूल केली. श्री. पडगिलवार यांनी लेखी विचारणा केल्यावर दिलेल्या उत्तरात आमदाराचे नाव राम शिंदे नसून सुनील शिंदे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे निधी लाटण्यासाठी आमदारांच्याही नावांचा गैरवापर चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय करत असल्याचा आरोप होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com