Agricultural Inputs Purchase : अधिकृत विक्रेत्यांकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करा

Agriculture Department : बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि त्याची पक्की पावती घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे.
Agriculture Inputs
Agriculture InputsAgrowon

Amravati News : बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि त्याची पक्की पावती घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे.

Agriculture Inputs
Agriculture Seeds and Input Scarcity : बियाणे, खते, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई

ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसेल तेथे पेरणीची घाई न करता १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरण्या धरण्याचे आवाहन करताना विभागीय सहसंचालक मुळे यांनी शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून कृषी निविष्ठांची खरेदी करावी. बनावट, भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह निविष्ठा खरेदी करावी, खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती आदी सर्व पीक कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.

Agriculture Inputs
Agriculture Inputs : शेतकऱ्यांना रास्त दराने निविष्ठा विका, पावती द्या

संकरित कापूस बियाण्याच्या बीजी दोन विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. कमी वजनाच्या तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने निविष्ठा विक्री होत असल्यास तक्रारीसाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ या व्हॉटस्अॅप नंबरवर तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक

अमरावती विभागासाठी संजय पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अमरावती ९४२३१३२६२६.

बुलडाणा जिल्हा : अरुण इंगळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, बुलडाणा ८१०४७९२०६३.

अकोला : सतीश दांडगे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अकोला ९७६६२७३५०७.

वाशीम : आकाश इंगोले जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वाशीम ९४२०३५३३०९

अमरावती : जिल्ह्यासाठी सागर डोंगरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अमरावती ८७८८८२१७८०.

यवतमाळ : कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, यवतमाळ ९४२३४४३९०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com