Mahaorange : संत्रा उत्पादकांना वाचवा

Orange Producers Issue : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना पाच एकरांच्या मर्यादेत एकरी २० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Orange
OrangeAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना पाच एकरांच्या मर्यादेत एकरी २० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

‘महाऑरेंज’च्या पत्रानुसार, गेल्या चार ते पाच वर्षांपासून विदर्भातील संत्रा उत्पादक विविध कारणांमुळे आर्थिक अडचणीत आला आहे. संत्रा बागायतदार आंबिया, मृग बहार घेतात. त्यावेळी तापमानातील वाढ तर कधी बाग ताणावर असताना पडणारा पाऊस यामुळे फळगळती तसेच इतर कारणांमुळे उत्पादकता प्रभावित होते.

Orange
Orange Processing : सव्वातीन लाख टन संत्र्यावर करणार प्रक्रिया

तसेच बांगलादेशने आयात शुल्कात ८८ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कमी उत्पादकता असतानाही संत्रा फळांना अपेक्षित दर मिळाला नाही. १५ ते २० हजार रुपये टन याप्रमाणे संत्र्याचे व्यवहार होत आहेत.

ही बाब लक्षात घेता संत्रा बागायतदारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने त्यांना एकरी २० हजार रुपयांचे अनुदान द्यावे. यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये श्री. फडणवीस यांनी संत्रा बागायतदारांसाठी १८० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्या वेळी आंबिया बहरातील फळांचा हंगाम संपून मृगातील फळांचा बहर सुरू झाला होता. याच निधीत आता अतिरिक्‍त २२० कोटी रुपयांची भर टाकल्यास संत्रा बागायतदारांना पाच एकराच्या मर्यादेत सरसकट प्रतिएकरी २० हजार याप्रमाणे एक लाख रुपये देता येतील.

Orange
Orange Processing : सव्वातीन लाख टन संत्र्यावर करणार प्रक्रिया

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड असून, त्यातील सर्वाधिक ७० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्यानंतर नागपूर व उर्वरित राज्यात क्षेत्र आहे.

संत्रा दरातील पडझड, विमा परतावा न मिळणे, नैसर्गिक कारणांमुळे फळांची होणारी गळ, बांगलादेशने निर्यात शुल्कात केलेली वाढ आदी कारणांमुळे संत्रा बागायतदार मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे त्याला किमान शेती मशागत, खते, कीटकनाशके यासाठी पैसे मिळावेत, यासाठी एकरी २० हजार रुपयांची मागणी केली आहे.
श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com