Satej Patil Sugar Factory : सतेज पाटील यांच्या साखर कारखान्याकडून एफआरपीपेक्षा २०० जादा देण्याचा निर्णय

Sugarcane Frp : एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कारखान्याने यावर्षीही कायम ठेवली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.
Satej Patil Sugar Factory
Satej Patil Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Sugarcane Rate : गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याकडून चालू हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ३२०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कारखान्याने यावर्षीही कायम ठेवली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली.

आमदार पाटील म्हणाले, 'कारखान्याची चालू हंगामाची एफआरपी प्रतिटन ३ हजार ७६२ रुपये असून त्यातून तोडणी वाहतूक खर्च ७४२ रुपये वजा जाता निव्वळ एफआरपी ३ हजार २० रुपये होते. परंतु शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्यासाठी एफआरपीपेक्षा १८० रुपये जादा उचल देऊन प्रतिटन ३ हजार २०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

गतवर्षी देखील कारखान्याने एफआरपीपेक्षा प्रतिटन १४७ रुपये जादा दिले असून चालू वर्षीही एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. कारखान्याचा सहवीज व डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

Satej Patil Sugar Factory
Satej Patil and Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी शब्द पाळावा अन्यथा..., गाय दूध दर कपातीवरून शेतकरी आक्रमक

कारखान्याने २ डिसेंबरअखेर १ लाख १५ हजार १० मे. टन उसाचे गाळप करून १ लाख ६ हजार ७५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

चालू वर्षी कारखान्याचे ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्याकरिता ९८२६ हेक्टर उस क्षेत्राची नोंद झाली आहे. कारखान्याने ठरवलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवावा. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील उपस्थित होते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com