Phd Fellowship paper leaked
Phd Fellowship paper leakedAgrowon

PHD Fellowship Paper Leaked: विद्यार्थ्यांच्या माथी पेपर फुटीचे गृहन; सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला

Sarthi, Barty and Mahajyotis Paper Leaked : राज्यतील विविध पदासांठी परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र या परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि पेपर फुटीचे गृहन काही सुटता सुटलेले नाही. ज्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच हे पेपर रद्द करावेत अशी देखील मागणी केली आहे.
Published on

Pune News : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या नशीबावर पाणी फेरण्याचा गलथान कारभार पुणे विद्यापीठातील सेट विभागाने सुरूच ठेवला आहे. या विभागाकडून सारथी, बार्टी, महाज्योतीची पात्रता (CET) परीक्षा घेण्यात येते. पण CET परीक्षा पेपर पुन्हा फुटल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला. तसेच ही परिक्षाच रद्द करावी अशी मागणी लावून धरली आहे.

झेरॉक्स प्रश्नपत्रिकांचे वाटप

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथे बुधवारी (ता. १० रोजी) परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी पात्रता (CET) परीक्षा घेण्यात येत होती.

Phd Fellowship paper leaked
Maulana Azad Board : ‘मौलाना आझाद’ महामंडळाला ‘सारथी, बार्टी’प्रमाणे निधी द्या

यादरम्यान येथे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका या झेरॉक्स असणाऱ्या देण्यात आल्या. तसेच पेपर सुरु होताच पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. यामुळे पोलीस आणि विद्यार्थी संघटना यांच्यात जोरदार बाचबाची झाली.

विद्यार्थ्यांना बहिष्कार अन् मागणी

पेपर फुटीचे वारंवार होणार प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्यांत प्रचंट उद्रेक पाहायला मिळाला. यावेळी पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांनी पात्रता परीक्षेवर बहिष्कार टाकला. तसेच ही परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी केली आहे.

Phd Fellowship paper leaked
‘महाज्योती’ची ओबीसी संशोधकांना फेलोशिप द्यावी’

पुण्याबरोबरच नागपूर, छत्रपती संभाजीनगरातही पेपर फुटी

पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटीचे प्रकरण स्पष्ट झाला. त्यानंतर पुण्यात गोंधळ उडाला होता. यादरम्यान नागुपरमध्येही पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्याची बाब समोर आली. येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या मैदानात फेलोशिपची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार अंदोलन केले. त्यांनी पेपरच्या झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या होता.

तर पुणे आणि नागुपरमधील पेपर फुटीचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले. येथील देवगिरी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच निषेध नोंदवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com