परभणी ः महाज्योती संस्थेमार्फत (Mahajyoti Institute) इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गातील पी. एचडी. (आचार्य पदवी) करणाऱ्या सर्व पात्र संशोधकांना महात्मा जोतिराव फुले अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) (Fellowship) देण्यात यावी, अशी मागणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पी. एचडीच्या विद्यार्थ्यांनी सहकार, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे शनिवारी (ता.१७) केली.
राज्य शासनाच्या महाज्योती या स्वायत्त संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्गातील पी.एचडी.(आचार्य पदवी) करणाऱ्या संशोधकांना महात्मा जोतिराव फुले संशोधन अधिछात्रवृत्ती यंदा २०२२-२३ पासून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गतवर्षी सरसकट छात्रवृत्ती देण्यात आली. परंतु यंदाच्या जाहिरातीमध्ये जागांची संख्या २०० एवढीच मर्यादित आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. महाज्योती संस्थेने सारथी आणि बार्टी च्या धर्तीवर सरकट विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी. शहरी आणि ग्रामीण आरक्षण काढून टाकावे. सुरवातीची दोन वर्षे प्रतिमहिना ३१ हजार रुपये अधिक निवासी भत्ता, शेवटची तीन वर्षे प्रतिमहिना ३५ हजार रुपये अधिक निवासी भत्ता तसेच आकस्मिक वार्षिक खर्च देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.