Land Encroachment : गायरानात घर बांधल्याने मावलगावचे सरपंच अपात्र

Sarpanch Disqualification : सरकारी गायरान जमिनीतील जागा ताब्यात घेऊन त्याची ग्रामपंचायत दफ्तरी ‘आठ अ’ला नोंद घेतली. पुढे त्यावर आरसीसी घराचे बांधकामही केले.
Grampanchayat
GrampanchayatAgrowon

Latur News : सरकारी गायरान जमिनीतील जागा ताब्यात घेऊन त्याची ग्रामपंचायत दफ्तरी ‘आठ अ’ला नोंद घेतली. पुढे त्यावर आरसीसी घराचे बांधकामही केले. मावलगाव (ता. अहमदपूर) येथे लोकनियुक्त म्हणजे जनतेतून निवडून आलेले सरपंच शिवाजी संपते यांचा सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचा हा प्रकार त्यांच्या अंगलट आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी त्यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरविले आहे.

सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संपते यांची थेट जनतेतून सरपंचपदी निवड झाली. सरपंच होण्यापूर्वी २०१५ मध्ये त्यांनी गावच्या शिवारातील सरकारी गायरान जमिनीतील दोन हजार चौरस फूट जागा ताब्यात घेतली होती. त्यापुढे जाऊन त्यांनी १०० रुपयांच्या स्टँपपेपवरील शपथपत्र तत्कालीन सरपंचांना दिले.

Grampanchayat
Farm Rod Encroachment : अतिक्रमित शेतरस्ता अर्ध्या तासात मोकळा

सरपंचांनी मासिक सभेत ठराव घेत गाव नमुना ‘आठ अ’ला जागेची नोंद घेतली. या प्रकरणी गणपत संपते व रंगनाथ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे सरपंच संपते यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली.

Grampanchayat
Forest Land Encroachment : अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटण्याची आशा

दरम्यान, श्री. ठाकूर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यात सरपंच संपते यांनी घराची जागा ही त्यांची वैयक्तिक व स्वतंत्र मालकीची असल्याचे सांगून वाडवडीलांपासून ते जागेचा उपभोग घेत असल्याचे सांगितले व अर्ज फेटाळून लावण्याची मागणी केली. मात्र, भूमिअभिलेख विभागाने केलेल्या मोजणीत सरपंच संपते यांनी बांधलेले घर सरकारी गायरान जमिनीत असल्याचे व या जागेवर संपते यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. यामुळे ठाकूर यांनी संपते यांना अपात्र ठरवून मावलगावचे सरपंचपद रिक्त घोषित केले.

दोनवेळा मोजणी तरीही...

या प्रकरणातील जमिनीवरील अतिक्रमण आहे, की कसे? याची खात्री करण्यासाठी अहमदपूरच्या उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली. त्यात घर व जागा गायरान जमिनीत असल्याचे पुढे आले.

त्यावर संपते यांनी आक्षेप घेऊन पुन्हा मोजणीची मागणी केली. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली व जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांच्यामार्फत पुन्हा मोजणी केली. यातही ही जागा गायरान जमिनीत असल्याचे सिद्ध झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com