Farm Rod Encroachment : अतिक्रमित शेतरस्ता अर्ध्या तासात मोकळा

तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी या रस्त्याचे स्थलनिरीक्षण केले.
Farm Road Encroachment
Farm Road EncroachmentAgrowon
Published on
Updated on

धरणगाव, जि. जळगाव : पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव) येथील एका शेतकऱ्याचा शेतरस्ता (Farm Road) एकाने प्लॉट ‘एनए’ (Nin Agriculture Land) करताना काबीज केला होता. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी जागेवर भेट देऊन ‘ऑन दि स्पॉट’ निर्णय घेत शेतकऱ्याचा रस्ता मोकळा करून दिला.

Farm Road Encroachment
Rural Road Issue : पाणंद रस्त्यांच्या कामांना ‘ब्रेक’

पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव) येथील शेतकरी आपल्या शेतरस्त्याबाबत कैफियत घेऊन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे आले होते. तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी या रस्त्याचे स्थलनिरीक्षण केले. यात सागर संजय अग्रवाल (रा. जळगाव) यांनी एनए केलेल्या क्षेत्रालगत शेतकऱ्यांचा जुना वहिवाट रस्ता बंद केला होता.

Farm Road Encroachment
Farm Road : आधी शेतरस्ते, मगच ‘समृद्धी’ची भिंत

यामुळे शेतकऱ्यांचा वापर बंद झाला होता. या बाबीची पाहणी करून तहसीलदार देवरे यांनी अग्रवाल यांना समजावत एका बांधावरील शेतकरी रूपचंद ठाकरे यांच्याकडून ४ फूट व सागर अग्रवाल यांच्या शेतातून ८ फूट असा १२ फुटांचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अवघ्या अर्ध्या तासात खुला करून दिला.

दोघांमध्ये समझोता झाल्याने तातडीने मार्ग काढणे सोपे झाले. सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार देवरे यांच्या तत्परतेचे कौतुक केले. या प्रसंगी तलाठी प्रशांत पाटील, कोतवाल राहुल शिरोळे व शेतकरी हजर होते.

‘समस्या सोडविण्यासाठी बांधिल’

देवरे म्हणाले, ‘‘ या समस्येबाबत माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (गुरुवारी, ता. १९) जाऊन पाहणी केली. वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन दोघा शेतकऱ्यांना समजावून सांगितले व सामंजस्याने रस्ता खुला केला. शेतकऱ्यांसाठी व समस्या सोडविण्यासाठी तहसील प्रशासन बांधिल आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com