Temple Facility : सप्तशृंगीदेवीचे मंदिर २४ तास खुले

Saptashrungi Devi Temple : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर रविवार (ता. २९)पासून २ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
Saptashrungi Devi Temple
Saptashrungi Devi TempleAgrowon
Published on
Updated on

Nashik News : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती मंदिर रविवार (ता. २९)पासून २ जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षानिमित्त अनेक जण तीर्थक्षेत्राला जाणे पसंद करतात. आद्य स्वयंभू शक्तिपीठ व उत्तर महाराष्ट्राची कुलदैवता असलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या सप्तशृंगडावर भाविकांबरोबरच पर्यटकांचीही दरवर्षी मोठी गर्दी पाहायला मिळते. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो, ही प्रार्थना आणि नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन याठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात.

Saptashrungi Devi Temple
Guddapur Temple : गुड्डापूरचे दानम्मा देवी मंदिर पाडण्यास ‘पुरातत्व’ची मनाई

यासाठी जिल्ह्यातून नव्हे, तर राज्यातून, राज्याच्या बाहेरूनही भाविक नवीन वर्षाला दर्शन घेण्यासाठी सप्तशृंगगडावर हजेरी लावतात. नवीन वर्षाची सुरुवात भगवतीच्या आशीर्वादाने व्हावी, ही अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.

Saptashrungi Devi Temple
Crop Competition : फळे, भाजीपाला, मसाला पिके स्पर्धा २ जानेवारीला!

रविवारची (ता. २९) सुटी, सोमवारी (ता. ३०) सोमवती अमावास्येमुळे मार्कंडेय पर्वतावर असणारी मार्कंडेय ऋषी यात्रा, मंगळवारी (ता. ३१) मॅन्थ व इयर एन्ड, तसेच १ जानेवारीस नववर्षाच्या स्वागतासाठी गडावर भाविकांची गर्दी राहणार आहे. बहुतांश शाळांना नाताळच्या सुट्यांमुळे आणि शनिवार (ता. २८)पासूनच शासकीय सुट्यांमुळे राज्य व राज्याबाहेरील चाकरमाने तीर्थाटन व पर्यटनासाठी घराबाहेर पडली असल्याने गडावर भाविकांची गर्दी वाढली आहे.

दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने नववर्षानिमित्त २९ डिसेंबरपासून २ जानेवारी रात्री नऊपर्यंत मंदिर सलग उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदुरी ते सप्तशृंगीगड घाटरस्त्यात दरड प्रतिबंधात्मक सुरू असलेले काम भाविकांच्या गर्दीमुळे थांबविले असल्याने घाट रस्ता २४ तास सुरळीत राहणार आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com