Guddapur Temple : गुड्डापूरचे दानम्मा देवी मंदिर पाडण्यास ‘पुरातत्व’ची मनाई

Danamma Devi Temple : लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर (ता. जत, जि.सांगली) येथील दानम्मा देवी मंदिर पाडण्यास पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने मनाई केली आहे.
Guddapur Temple
Guddapur TempleAgrowon
Published on
Updated on

Solapur News : लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर (ता. जत, जि.सांगली) येथील दानम्मा देवी मंदिर पाडण्यास पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने मनाई केली आहे. त्यामुळे नवे मंदिर बांधण्यासाठी ऐतिहासिक वारसा नष्ट करता येणार नाही.

गुड्डापुरात बाराव्या शतकात होऊन गेलेल्या दानम्मा देवी यांचे मंदिर आहे. मंदिर विश्वस्तांकडून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मिळालेल्या पाच कोटी निधीतून मंदिर परिसरात विकासकामे सुरू आहेत. ऐतिहासिक मंदिर पाडून तेथे नव्याने मंदिर बांधण्याचा घाट विश्वस्तांनी घातला आहे.

Guddapur Temple
Ambabai Temple : आता अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाऊन घेता येणार दर्शन

याविरोधात खानापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील भक्त विजयकुमार बिराजदार यांनी पुण्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे विभागीय संचालक यांच्यासह कोल्हापूरच्या सहायक धर्मादाय आयुक्त, सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी मंगळवारी (ता. १९) मंदिर पाडण्याबत मनाई आदेश काढला आहे.

हे मंदिर प्राचीन असल्याने त्याचे मूळ स्वरूपानुरूप जतन होणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव मंदिराचे पाडकाम सुरू असल्यास ते तत्काळ थांबवावे. मंदिरात कोणतेही फेरबदल व आधुनिक स्वरूपाचे काम करू नये. तसेच भविष्यात पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

Guddapur Temple
Ambabai Temple : श्री अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट, १४४७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

मंदिराचा काही भाग पाडून बांधकाम

श्री दानम्मा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यासाठी या ऐतिहासिक मंदिराभोवती नैवेद्य बनविण्यासाठी ओवऱ्या होत्या. मंदिर समितीने त्या पाडून तेथे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले आहे.

मंदिर विश्वस्तांनी प्राचीन मंदिर पाडून तेथे नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंदिर परिसरात पाडकाम सुरू आहे. विकासाच्या नावाखाली गर्भगृहासह मंदिर पाडण्याचा व दानम्मादेवीच्या स्मृती जपणारी विहीर बुजवून ऐतिहासिक वारशाला नख लावण्याचाच हा प्रयत्न आहे. त्याला पुरातत्त्व विभागाने मनाई केली आहे. मात्र, याविरोधात महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनीही कडाडून विरोध करण्याची आवश्यकता आहे.
- विजयकुमार बिराजदार, भाविक व तक्रारदार, खानापूर, ता. दक्षिण सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com