Thane Planning Committee : विकसित ठाण्याचा संकल्प

District Development Plan : एक हजार १६ कोटींचा एकत्रित जिल्हा नियोजन आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने संमती दिली आहे.
Thane Collector Office
Thane Collector OfficeAgrowon

Thane News : ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ७५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मागील वर्षापेक्षा १३२ कोटींनी हा निधी जास्त आहे. कामांची निकड, आवश्यकता आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करून एक हजार १६ कोटींचा एकत्रित जिल्हा नियोजन आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने संमती दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून एकजुटीने लोकाभिमुख काम करतील, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

Thane Collector Office
Jalgaon Planning Committee : नियोजन समितीचा २३ टक्के खर्च

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे आयोजित केला होता. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम राबविण्यात आला.

यात ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ४३१ ग्रामपंचायतीमधील तब्बल एक लाख ६० हजार १५८ लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ दिल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, दत्तात्रय कराळे, प्रवीण पवार, विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.

Thane Collector Office
District Development Plan : नांदेडला ६३४ कोटींच्या आराखड्यास मान्यता

सारथीची साथ :

सारथी प्रकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मराठा/कुणबी/ मराठा-कुणबी/कुणबी-मराठा प्रवर्गातील ग्रामीण भागातील १८० व शहरी भागातील ६२० असे एकूण ८०० उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून २८९ नामांकित उद्योजकांसमवेत सामंजस्य करार केला आहे.

पोलिस दलासाठी वाहने

मोटार वाहने खरेदी योजनेअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलिस दलाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये इतक्या निधीतून एस्कॉर्टकरिता एकूण ९ चारचाकी वाहने, ठाणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयांतर्गत ६ कोटी २५ लाख ४४ हजार रुपये इतक्या निधीतून ५० वाहने आणि नवी मुंबई पोलिस दलाकरिता २ कोटी ३ लाख २९ हजार इतक्या निधीतून एकूण १७ वाहने खरेदी केली आहेत. तर २०२३ मध्ये पोलिस शिपाई पदाच्या ५२१ रिक्त जागांची भरतीही घेण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com