Sanjay Raut : मुंबई ते नागपूर स्‍वबळावर निवडणुका लढणार; ठाकरे गटाचे संकेत, महाविकास आघाडीत बिघाडी

Shivsena Thackeray Group : काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये शाब्दिक मतभेद होत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
Mahavikas Aghadi Maharashtra
Mahavikas Aghadi Maharashtraagrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आघाडीत बिघाडी होण्यास सुरूवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये शाब्दिक मतभेद होत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही स्वबळाने लढणार आहोत असे संजय राऊत म्हणाले आहेत.

खासदार संजय राऊत शनिवार(ता.११) माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की, “मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायचीच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. असे राऊत म्हणाले.

"आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Mahavikas Aghadi Maharashtra
Munde Bhujbal Political Discussion : पाठराखणीनंतर मुंडेंनी घेतली भुजबळांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एकला चलो रे च्या भूमिकेमुळे मविआत आता फुट पडल्‍याचे समोर आले आहे. त्‍यातच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्‍ट्रवादीही स्‍वबळावर पुढच्या निवडणुका लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com