Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार व वृध्द भूमीहीन शेतमजुरांचे अनुदानाचे होणार वाटप

Grants from State Government : संजय गांधी निराधार योजना आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांचे अनुदानाचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माहे एप्रिल ते जुलै-२०२४ या कालावधीसाठी शासनाने सुमारे ६० कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अनुदान राज्य शासनाकडून दिले जाते.
Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana Agrowon

Pune News : संजय गांधी निराधार योजना आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांचे अनुदानाचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माहे एप्रिल ते जुलै-२०२४ या कालावधीसाठी शासनाने सुमारे ६० कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अनुदान राज्य शासनाकडून दिले जाते. यंदा माहे एप्रिल ते जुलै-२०२४ या कालावधीतील अनुदान देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी लागणारा निधी देखील दिला आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन आदेश सोमवारी (ता. ०८) काढला असून ६० कोटींहून अधिक रक्कम वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. 

संजय गांधी निराधार योजनेसाठी जिल्हा आस्थापनेसाठा ४१, ८७, ४८, ७६० रूपये आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अनुदान अर्थसहाय्य या योजनेसाठी १७, १७, २५, ८४० रूपये असे ६० कोटी ४ लाख ७४ हजार ६०० रूपये मंजुर केले आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेसाठी मंजूर तरतूदीतून वेतन -१ साठी १० कोटी ४६ लाख ८७ हजार १९० रूपये आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अनुदान अर्थसहाय्य या योजनेच्या आस्थापनेसाठी ४ कोटी २९ लाख ३१ हजार ४६० रूपये  इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. 

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Yojana : ‘योजनेची कागदपत्रे स्वत: सादर करा’

तर हा निधी माहे एप्रिल ते जुलै-२०२४ या कालावधीकरीका ०१- वेतनाच्या उद्दीष्टासाठी देण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्तांना अनुदानाचा निधी विवरणपत्र-अ आणि ब प्रमाणे जिल्ह्यांना आणि जिल्हाधिकारी यांनी तालुक्यांना द्यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तर हा खर्च संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापना आणि वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अनुदान अर्थसहाय्य या योजनेखालील खर्चासाठी इतर आस्थापना अशा लेखाशीर्षाखाली करावा असेही म्हटले आहे. तर खर्चाचा ताळेबंद न झाल्यास किंवा महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत उपयोगिता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकारी यांच्यावर राहील असे देखील या शासन आदेशात म्हटले आहे. 

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Raut on Farmers Essue : 'या सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही'; राऊतांचा हल्लाबोल

संजय गांधी निराधार योजनेसाठी विभागास देण्यात आलेला निधी

पुणे - १ कोटी ८३ लाख ५२ हजार १६० रूपये

कोकोण - १ कोटी ७६ लाख २३ हजार १५० रूपये

नाशिक - २ कोटी ४ लाख ९६० रूपये

नागपूर - १ कोटी ६७ लाख ९१ हजार ७० रूपये

अमरावती - १ कोटी ७६ लाख १६ हजार ७० रूपये

छ. संभाजीनगर - १ कोटी ३९ लाख ३ हजार ७८० 

वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अनुदान अर्थसहाय्य या योजनेखाली विभागास देण्यात आलेला निधी

पुणे - ७१ लाख ५५ हजार रूपये

कोकोण - ७१ लाख ५५ हजार रूपये

नाशिक - ७१ लाख ५५ हजार ४६० रूपये

नागपूर - ७१ लाख ५५ हजार रूपये

अमरावती - ७१ लाख ५६ हजार रूपये

छ. संभाजीनगर - ७१ लाख ५५ हजार रूपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com