
Sangli News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे ८३ प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. मे महिन्यात २८ टक्के इतका पाणीसाठा होता. वीस दिवसांत २३ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.
अर्थात जूनच्या मध्यावर ८३ प्रकल्पांत ३९६३ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ५१ टक्के इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. जत तालुक्यातही तब्बल १६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता ९३५३ दशलक्ष घनफूट इतकी आहे. फेब्रुवारीपासून प्रकल्पातील पाणीसाठा कमी होऊ लागला. मे महिन्याच्या प्रारंभी १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. तर जत तालुक्यात अवघा ६ टक्के इतकाच पाणीसाठा होता. त्यामुळे दुष्काळी भागासह इतर भागात पाणी टंचाईची दाहकता वाढली होती.
दरम्यान, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हा पाऊस जत तालुका वगळता सर्व तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला. मे महिन्याच्या अखेरीस १० टक्क्यांनी वाढून तो २८ टक्के इतका झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, जत तालुक्यातील २७ प्रकल्पात ६ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे जत तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली होता.
गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे. सध्या ५२०५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. त्यापैकी ३९६३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाणीसाठा झाला आहे. खानापूर तालुक्यातील सहा, आटपाडी आणि जत तालुक्यातील प्रत्येकी तीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
यंदा दुप्पट साठा
जिल्ह्यात गतवर्षी जून महिना संपला तरी, पावसाने दडी मारली होती. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला नव्हता. गतवर्षी ८३ प्रकल्पात १९६९ दशलक्ष घनफूट म्हणजे २५ टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा मॉन्सून पूर्व मुसळधार पाऊस झाला. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ३९६३ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा आहे.
तालुकानिहाय मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा
तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
तासगाव ७ ३१९.५२ ५७
खानापूर ८ ५०१.२२ ९१
कडेगाव ७ ५३४.१६ ८४
शिराळा ५ ६२८.८० ७१
आटपाडी १३ ६९१.५६ ६०
जत २७ ६५३.८२ २२
कवठेमहांकाळ ११ ५००.३० ६०
मिरज ३ १०९.९१ ९१
वाळवा २ २३.६२ ४९
एकूण ८३ ३९६२ ५१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.