Sangli APMC Election जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी सत्ता राखत भाजपचा धुव्वा उडवला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) १६ उमेदवार निवडणून आले. व्यापारी गटातील दोन स्वतंत्र उमेदवार विजयी झाले. भाजपला धक्का बसल्याने आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानली जाते. बाजार समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी नेत्यांची राजकीय खेळी सुरू होती.
बाजार समितीसाठी मतदान चुरशीने झाल्याने मतदानाचा टक्का वाढून दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शनिवारी (ता. २८) सकाळपासून मिरजेतील बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली.
दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालाच्या दरम्यान, गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सकाळी पहिला निकाल दहाच्या सुमारास जाहीर झाला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली.
पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय पाटील यांनी निवडणूक जिंकण्यासाठी ताकद लावली होती. परंतु आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांची मोट बांधली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांना पराभवाचा धक्का दिला.
महेश पवार, बाबगोंडा पाटील, रामचंद्र पाटील, संग्राम पाटील, बापुसो बुरसे, सुजय शिंदे, स्वप्नील शिंदे, बिराप्पा शिंदे, कुसुम कोळेकर, शंकुतला बिराजदार, बाबासाहेब माळी, आनंदराव नलवडे, रावसाहेब पाटील, रमेश पाटील, शशिकांत नागे, व्यापारी गटात प्रशांत पाटील, कडाप्पा वारद आणि हमाल-तोलाई गटातून मारुती बंडगर विजयी झाले.
इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादीचा विजय
इस्लामपूर बाजार समितीसाठी सर्व पक्ष एकत्र आले. राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्ष अशी मोट बांधली तरी इस्लामपुरात राष्ट्रवादीने बाजी मारली. विटा बाजार समितीत काँग्रेस, शिवसेना (शिंदेगट) आणि भाजप अशी युती करण्यात आली होती. विटा बाजार समितीत राष्ट्रवादीला धक्का बसला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.