Sangli APMC Election : अंतर्गत वादांमुळे भाजपचे सत्तेचे स्वप्न विरले

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतभेद बाजूला महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली वज्रमुठ बांधली.
Sangli APMC
Sangli APMC Agrowon

Sangli Election Update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतभेद बाजूला महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली वज्रमुठ बांधली. त्यामुळे बालेकिल्ला पुन्हा हातात ठेवण्यास यश आले. सत्ता मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले असले तरी, अंतर्गत ‘वादा’मुळे सत्तेच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

सांगली बाजार समिती राज्यासह देशात प्रसिद्ध आहे, अशी ओळख आहे. बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर झाल्या नसल्या तरी, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागत होती. त्यामुळे राज्यातील सर्वाचे लक्ष निवडणुकीवर असायचे.

यंदाच्या निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार हे नक्कीच होते. त्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांची आपआपल्या पातळीवर कशा पद्धतीने निवडणूक लढवता येईल, याची चाचपणी सुरु केली.

दरम्यान, यंदाची निवडणूक स्थानिक आघाडी करुनच होईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. निवडणुकीत रंगात आली असतानाच पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

Sangli APMC
APMC Election : संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता

दरम्यान, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांनी कार्यकत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये आघाडीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रम सावंत यांनीही आघाडीसाठी एकमत होते.

सर्वांचे एकमत झाले, गोंधळ सुटला. महाविकास आघाडी झाली. प्रचार एकमताने आणि एकदिलाने केला. त्यामुळे निवडणूक सोपी जाईल अशा विश्वास नेत्यांना आला. प्रचारादरम्यान दुसऱ्या तिसऱ्या फळतील नेते आणि कार्यकर्ते गाफील राहिले नाहीत.

Sangli APMC
APMC Election Maharashtra : दुसऱ्या टप्प्यातही चुरशीने मतदान

एकाबाजूला पालकमंत्री यांनी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार अशी घोषणा केली खरी पण त्यांच्या साथीला कोण कोण आले याचा विचार करण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप यांची बाजार समिताच्या प्रचारासाठी किती योगदान दिले.

याबाबत शाशंकता व्यक्त होत आहे. खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यातील राजकीय संघर्ष मिटला नाही. भाजपमधील नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष हा आजचा नाही. तो कायमचाच आहे. या अंतर्गत संघर्षामुळेच जिल्ह्यातील भाजपला धक्का बसला असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. भाजपला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com