Sangli District Bank : सांगली जिल्हा बँक राज्यात पहिल्या पाचमध्ये

Economic Progress : सांगली जिल्हा बॅँकेने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे राज्यातील पहिला पाच जिल्हा बॅंकांमध्ये समावेश झाला आहे.
Sangli District Bank
Sangli District BankAgrowon

Sangli News : सांगली जिल्हा बॅँकेने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे राज्यातील पहिला पाच जिल्हा बॅंकांमध्ये समावेश झाला आहे. बॅँकेच्या प्रगतीचे सहकार मंत्री, सहकार आयुक्तांनी कौतुक केले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात दुष्काळ असतानाही ठेवींमध्ये तब्बल एक हजार कोटींची वाढ झाली, अशी माहिती बॅँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

राज्यातील सर्व जिल्हा बॅँक अध्यक्ष, सीईओ, सहकार आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात बॅंकांच्या आढावा घेतला. गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळ असतानाही जिल्हा बॅँकेच्या ठेवींमध्ये तब्बल एक हजार कोटींची वाढ झाली आहे. याची विशेष नोंद त्यात घेतली.

Sangli District Bank
District Central Bank Funds : अमरावती विभागासाठी ‘ती’ अट शिथिल करा

सहकार विभाग आयुक्त शैलैश कोतमिरे यांनी जिल्हा बॅँकेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली होती. त्यांची बैठकीत माहिती दिली. सांगली जिल्हा बॅँकेने मार्च-२४ अखेर तब्बल २०४ कोटींचा नफा मिळवला. नंतरही या नफ्यात वाढच झालेली आहे. बॅँकेचा ‘एनपीएस’ पाच टक्क्यांहून कमी झाला आहे. रिझर्व्ह बॅँक, ‘नाबार्ड’ यांच्या सर्व निकषांमध्ये बॅँक खरी उतरली असून आर्थिक प्रगतीचे अनेक मापदंड बॅँकेने गाठले आहेत.

Sangli District Bank
Solapur District Bank : ‘डीसीसी’चे संचालक म्हणून काम करताना नाही केला विश्‍वासघात

संचालक मंडळावर शेतकऱ्यांचा विश्वास

अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, की सहकार मंत्री, सहकार आयुक्तांनी जिल्हा बॅँकेने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. सामान्य शेतकरी, बॅँकेचे सभासदांचा जिल्हा बॅँकेवर, संचालकांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळात बॅँक ठेवी एक हजार कोटींनी वाढल्या, ही विश्वासाची पोचपावती आहे. मार्च-२५ अखेर बॅँक प्रगतीची आणखी शिखरे पार करेल.

बॅँकेची प्रगती विरोधकांना बघवत नाही

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, की बॅँकेच्या मागील संचालक मंडळाची याआधीच शासनाने चौकशी सुरू केली आहे. यातून सत्य बाहेर येईल. राज्यात विरोधक सत्तेवर आहेत. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या सरकारवर विश्वास नाही का? बॅँकेवर मोर्चा काढून बॅँकेच्या व माझ्या बदनामीचे राजकारण विरोधक करत आहेत. अडीच वर्षांत मी केलेली बॅँकेची प्रगती त्यांना बघवत नाही, त्यांना पोटशूळ उठले आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकरी, सभासदांचा संचालकांवर पूर्ण विश्वास आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com