Solapur District Bank : ‘डीसीसी’चे संचालक म्हणून काम करताना नाही केला विश्‍वासघात

Financial losses of District Bank : जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या माजी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
Solapur District Bank
Solapur District BankAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी महापौर नलिनी चंदेले, मृत संचालक कै. बाबूराव चाकोते, कै. वि. गु. शिवदारे, बबनराव आवताडे, सुरेखा ताटे यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. त्यांनी बँकेसोबत विश्‍वासघात केला नाही असा उलटतपास बुधवारी (ता. १७) या दहा माजी संचालकांच्या वतीने ॲड. उमेश मराठे यांनी मांडला.

Solapur District Bank
Ratnagiri DCC Bank : रत्नागिरी जिल्हा बँकेला ६८ कोटी ५३ लाखांचा नफा

जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या माजी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत बँकेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर व प्रतिज्ञापत्रांवर सध्या संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने स्वत: वकिलांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांचा उलट तपास सुरू आहे.

या माजी संचालकांच्या मृत संचालकांच्या वारसांच्या वतीने ॲड. मराठे उलट तपास घेत आहेत. ॲड. मराठे यांचा उलट तपास बुधवारी पूर्ण झाला आहे. जिल्हा बँकेचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे सांगणारा चंद्रकांत टिकुळे यांचा सहकार कायदा कलम ८३ अन्वयेच्या अहवालालाच आव्हान दिले आहे.

Solapur District Bank
Nashik DCC Bank : थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅंक सरसावली

या अहवालातील त्रुटी, जबाब हे मुद्दे ॲड. मराठे यांनी आजच्या उलट तपासात मांडले. त्यामुळे या अहवालात नव्याने काही घडामोडी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. जिल्हा बँकेच्या चौकशी प्रकरणात अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे अलिप्त होते.त्यांनी आज त्यांचे वकीलपत्र ॲड. मराठे यांच्याकडे दिले. उलट तपासात माजी आमदार पाटील यांचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सोपल, मोहितेंचे मुद्दे २९ एप्रिलच्या सुनावणीत?

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल यांचे वकीलपत्र ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी घेतले आहे. ॲड. मराठे यांचा उलट तपास पूर्ण झाल्याने आता या प्रकरणातील पुढील सुनावणीत (ता. २९ एप्रिल) माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या वतीने उलट तपासाला सुरुवात होणार आहे.

माजी मंत्री सोपल यांच्याकडे पूर्वी असलेल्या आर्यन शुगर (खामगाव, ता. बार्शी) व मोहिते-पाटील यांच्याकडे पूर्वी असलेल्या विजय शुगर (करकंब, ता. पंढरपूर) व शिवरत्न शुगर (आलेगाव, ता. माढा) यामुळे जिल्हा बँक अडचणीत आल्याच्या टीका व आरोप झाला होता. या प्रकरणात सोपल व मोहिते-पाटील काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com