Dr. Bhagwat Karad : ठेवी परत करण्यासाठीची प्रक्रिया तत्परतेने राबवा

Adarsh Urban Co-operative Credit Society : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी, असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले.
Bhagwat Karad :
Bhagwat Karad :Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी, असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. ३) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासंदर्भात डॉ. कराड यांनी आढावा घेतला. या वेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया,

Bhagwat Karad :
Dr. Bhagwat Karad : प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करा

पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते. सहाआयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर, प्रशासन समितीचे सदस्य विष्णू रोडगे तसेच अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Bhagwat Karad :
Shetkari Sangh Election : शेतकरी संघाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्ष भाजपकडे, पुन्हा मंत्री मुश्रीफांचा वरचष्मा

डॉ. कराड म्हणाले, की ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना, पतसंस्थेच्या मालमत्तेचा लिलाव तसेच कर्जदाराने कर्ज घेताना पुरेसे तारण दिले किंवा नाही याबाबत तपासणी करावी व ठेवी परत करण्याबाबतची प्रक्रिया जलद गतीने राबवावी, लिलाव व या सर्व प्रक्रियेबाबत ठेवीदारांना वेळोवेळी माहिती द्यावी, जेणेकरून त्यांना दिलासा मिळू शकेल.’’ सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत माहिती दिली.

बैठकीच्या प्रारंभी पोलिस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली व सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com