Sowing Update : रत्नागिरीत दुबार पेरणीचे संकट टळले

Ratnagiri Rain News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे भातशेतीच्या कामांना वेग आला असून दुबार पेरणीचे संकट टळले.
Sowing Update
Sowing UpdateAgrowon

Ratnagiri Monsoon Rain Update : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे भातशेतीच्या कामांना वेग आला असून दुबार पेरणीचे संकट टळले. काहींनी लावणीपूर्वीची नांगरणी सुरू केली आहे. पावसामुळे ग्रामीण भागात नद्यांचे पाणी वाढले असून वहाळ भरून वाहू लागले.

बुधवारी (ता. २८) सकाळी ८.३० पर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४७.२२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ५५ मिमी, दापोली ४७, खेड २३, गुहागर ४५, चिपळूण ५९, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ४९, लांजा ६८, राजापूर १९ मिमी पाऊस झाला. १ जूनपर्यंत आतापर्यंत सरासरी २६५ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत ५७६ मिमी पाऊस होता.

Sowing Update
Rain Update : पूर्व विदर्भासह कोकण, घाटमाथ्यावर दमदार सरी

जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोसमी पावसाचे आगमन न झाल्याने जिल्ह्यातील भात शेती संकटात सापडली होती. सुमारे ३० टक्के क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या होत्या. पाणीच नसल्यामुळे रोप रुजून येणे अशक्य होते. सुदैवाने पावसाला सुरुवात झाली आणि दुबार पेरणीचे संकट टळले. गेले तीन दिवस जिल्ह्यात सरींचा पाऊस पडता होता.

मात्र बुधवारी पहाटेपासून वेगवान वाऱ्यासह संततधार पावसाला सुरुवात झाली. दापोलीत राजेंद्र काशिनाथ पारगले यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेल्यामुळे ९ हजारांचे, खेड तुळशी बुद्रुक येथे प्रकाश कृष्णा सुतार यांच्या घराच्या पडवीवर दगड कोसळून १५ हजारांचे, संगमेश्‍वरात ओझरे बुद्रुक येथील सुगंध शेजवळ यांच्या घरावर झाड पडल्याने ६ हजार रुपयांचे तर रत्नागिरी सोमेश्वर येथील शरद रसाळ यांच्या घरावर झाड पडून ८२ हजारांचे नुकसान झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com