Sakshi Malik : WFI निवडणुकीच्या निकालाने साक्षी मलिक निराश, केली कुस्ती सोडण्याची घोषणा

Sakshi Malik announced her retirement : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंह यांचे सहकारी आणि व्यवसायिक भागिदार संजय सिंह विजयी झाले आहेत. त्यामुळे कुस्तीपटू साक्षी मलिक ही नाराज झाली आहे.
Sakshi Malik
Sakshi MalikAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडनुकीत उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे उपाध्यक्ष संजय सिंह विजयी झाले. त्यावरून ऑलंपिक पदक विजेती साक्षी मलिकने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अश्रू नयनांनी कुस्ती सोडत असल्याची घोषणा दिल्लीत गुरूवारी (२१ रोजी) केली. तसेच यावरूनच पैलवान बजरंग पूनिया आणि विनेश फोगाट यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

निवृत्तीची घोषणा करताना साक्षी म्हणाली, 'मी याच्याआधीच सांगितले होते की, WFI च्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंह किंवा यांच्यासारखी व्यक्ती राहिली तर मी कुस्ती सोडून देईन'. 'आता तर संजय सिंह विजयी झाले आहेत. जे ब्रिजभूषण सिंह यांचे सहकारी आणि व्यवसायिक भागिदार आहेत. ते या पदावर राहणार आहेत. त्यामुळे मी कुस्ती सोडत आहे. 'मी आता यापुढे WFIमध्ये दिसणार नाही', असेही साक्षी मलिक हिने म्हटलं आहे.

पुढे साक्षी म्हणाली, 'अन्यायाविरोधात मनापासून आम्ही ही लढाई लढली. आम्ही ४० दिवस रस्त्यावर काढले. आम्हाला देशभरातून पाठिंबा मिळाला. मी पाठिंबा देणाऱ्या सर्व देशवासीयांचे आभार मानते'.

Sakshi Malik
Brij Bhushan : ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र

ब्रिजभूषण शरण सिंह यांची प्रतिक्रिया

कुस्तीपटू साक्षी मलिकच्या निर्णायाची माहिती ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मिळाली. याबाबत, 'साक्षी मलिकच्या या निर्णयाशी माझा काय संबंध?' असा सवाल करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच,"या विजयाचे श्रेय मला देशातील कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या सचिवांना द्यायचे आहे. महासंघाच्या नवीन फेडरेशन झाल्यानंतर कुस्तीच्या स्पर्धा पुन्हा सुरू होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Sakshi Malik
Delhi Wrestler Protest 2023: ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करत संयुक्त किसान मोर्चा उतरला मैदानात; कुस्तीपटूंचं आंदोलन तापणार

अध्यक्षपदावर पाणी

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. तसेच त्यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलन केले होते. तर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आपली पदके गंगेत बुडविण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले होते.

पहिली भारतीय महिला

साक्षी मलिक ही कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तिने २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५८ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले होत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com