Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Palkhi Sohala 2025: संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह राज्याच्या काना-कोपऱ्यातून रविवारी (ता.६) होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या शुक्रवारी (ता.४) वाखरी मुक्कामी पंढरपूरच्या वेशीवर विसावल्या.
Wari 2025
Wari 2025Agrowon
Published on
Updated on

Solapur News: संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह राज्याच्या काना-कोपऱ्यातून रविवारी (ता.६) होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पायी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या शुक्रवारी (ता.४) वाखरी मुक्कामी पंढरपूरच्या वेशीवर विसावल्या. शनिवारी (ता.५) त्या पंढरपुरात प्रवेशणार आहेत.

पंढरी अवघ्या काही अंतरावर आल्याने विठुरायाच्या दर्शनाने आता विसावा मिळणार असल्याचे भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले आहेत.आळंदीहून संत ज्ञानेश्‍वर महाराज, देहूहून संत तुकाराम महाराज, मुक्ताईनगरहून संत मुक्ताई, पैठणहून संत निवृत्तिनाथ त्याशिवाय संत सोपानदेवकाका, संत गजानन महाराज हे प्रमुख पालखी सोहळे या यात्रेसाठी पायी चालत येत असतात. त्याशिवाय अन्य पालख्यांचाही समावेश असतो.

Wari 2025
Ashadhi Wari 2025: माळीनगरात रंगले उभे रिंगण

विठ्ठलाचे दर्शन कधी घेतो, अशी अधीरता वारकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात आता पंढरी अगदीच जवळ आल्याने वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.काल शुक्रवारी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याने भंडीशेगाव आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पिराची कुरोलीच्या मुक्कामानंतर सायंकाळी वाखरीत प्रवेश केला.

रविवारी (ता.६) आषाढी वारीचा मुख्य सोहळा होत आहे.त्या आधी आदल्या दिवशी शनिवारी (ता.५) दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने दशमीच्या स्नानासाठी अनेक वारकऱ्यांची पंढरीकडे रीघ लागल्याचे चित्र होते. सध्या पंढरीत सुमारे ४ ते ५ लाखांहून अधिक वारकरी आल्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com