Kardai  Crop
Kardai CropAgrowon

Kardai Crop : मराठवाड्यात ३६ हजार हेक्टरवर करडईचे पीक

Kardai Farming Update : मराठवाड्यात खास करून लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत यंदा गत काही वर्षांच्या तुलनेत करडईचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.

Latur News : मराठवाड्यात खास करून लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत यंदा गत काही वर्षांच्या तुलनेत करडईचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. आठही जिल्ह्यांत जवळपास ३६ हजार ७१७ हेक्टर क्षेत्रावर करडई पिकाचा यंदा क्षेत्र विस्तार झाला आहे. सद्यःस्थितीत पीक पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत आहे काही ठिकाणी काढणे पूर्ण झाली आहे.

एकेकाळी मराठवाड्यात बहुतांश भागात तेलवान म्हणून करडईची मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची. त्यामुळे तेल घाण्यांना आवश्यक करडई सहज उपलब्ध व्हायची. सोयाबीनचा क्षेत्र विस्तार झाल्यापासून सोयाबीन अधिक हरभरा या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळत करडईसह इतर रब्बीतील पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट केली होती.

Kardai  Crop
Kardai Sowing : नांदेडला दहा हजार हेक्टरवर करडईची पेरणी

शासनाने योजनांच्या माध्यमातून करडई, जवस, तीळ यांसह इतर तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. परंतु मिळणारे अल्प दर, काढणीतील अडचणी, मजुरांची वानवा आदींमुळे करडईचा क्षेत्र विस्तार प्रत्यक्षात होण्यासाठी त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा प्रत्यक्षात ३४ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या जवळपास १७८ टक्के क्षेत्रावर करडईची पेरणी झाली. लातूर कृषी विभागातील करडईचे हे पीक सद्यःस्थितीत पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत आहे.

Kardai  Crop
Kardai Cultivation : जिरायती भागासाठी वरदान करडई

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र ४३० हेक्टर असताना प्रत्यक्षात ६६०.६० हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली जी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दीड पटीपेक्षा जास्त आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातही लातूर पाठोपाठ करडई पिकाचा स्वीकार वाढताना दिसतो आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र ११६५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७६४ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली. बीड जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र १०४२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४५१ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झाली. या दोन्ही जिल्ह्यांत मात्र करडईची सरासरी क्षेत्र इतकी पेरणी झाली नाही.

हरभरा पिकाला मर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होतीय. म्हणून शेतकरी आता करडई, जवस, पिवळी ज्वारी, बडी ज्वारी हे पीक घेतात. माझ्याकडे गेल्या ४ वर्षापासून मी १० एकरांवर करडई पीक घेतो आहे.
अशोकराव चिंते, करडई उत्पादक घारोळ ता. चाकूर, जि. लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com