Ashadhi Wari : चंद्रभागेत आता फक्त २० भाविकांसह करता येणार होडी प्रवास

Pandharpur Wari : जलसंपदा विभागाच्या पंढरपूर येथील भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने चंद्रभागा नदीमध्ये होडी चालवणाऱ्या तब्बल १८९ होडी चालकांना शनिवारी (ता. २८) ओळखपत्र व होडी क्रमांकाचे वाटप करण्यात आले आहे.
Chandrbhaga River Boating
Chandrbhaga River Boating Agrowon
Published on
Updated on

Pandharpur News : जलसंपदा विभागाच्या पंढरपूर येथील भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने चंद्रभागा नदीमध्ये होडी चालवणाऱ्या तब्बल १८९ होडी चालकांना शनिवारी (ता. २८) ओळखपत्र व होडी क्रमांकाचे वाटप करण्यात आले आहे. एका होडीत २० भाविकांनाच घेऊन जाणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय होडी चालकांना देण्यासाठी लाईफ जॅकेट देखील उपलब्ध झाले असून त्याचेही वाटप केले जाणार आहे अशी माहिती उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगवले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

Chandrbhaga River Boating
Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांच्या सेवेत कुचराई केल्यास कारवाई

काही दिवसांपूवी पार पडलेल्या आषाढी यात्रेच्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, एस. के. हरसुरे व अन्य अधिकाऱ्यांसह चंद्रभागा नदी परिसराची पाहणी केली होती.

Chandrbhaga River Boating
Ashadhi Wari : आषाढी सोहळ्यासाठी यंदा हटके तयारी

या पाहणी दरम्यान मंत्री गोरे यांनी नदीपात्रात होडी चालवणाऱ्या प्रत्येक चालकाची नोंदणी करण्याची सूचना केली होती. याशिवाय होडीमध्ये बसणाऱ्या प्रत्येक भाविकाला लाइफ सेविंग जॅकेट परिधान करणे अनिवार्य असून त्याप्रमाणे होडी चालकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्याची सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केली होती.

त्यांच्या सूचनेनुसार जलसंपदाच्या येथील भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने ज्या होडी चालकांनी विभागाकडे नोंदणी केली होती. त्या १८९ होडी चालकांना शनिवारी ओळखपत्र व होडी क्रमांक असलेल्या बॅनरचे वाटप करण्यात आले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com