Women Farmers: चाफा महिला कंपनीतर्फे कृषी कट्टा सेवा केंद्राचे उद्‌घाटन

Chafa FPO: चाफा शेतकरी उत्पादक कंपनी लि., एक पूर्णतः महिलांच्या मालकीची आणि महिलांनी चालवलेली कंपनी, हिच्यातर्फे कृषीकट्टा सेंद्रिय खत व कीटकनाशके विक्री केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.
Women Farmers
Women FarmersAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: चाफा शेतकरी उत्पादक कंपनी लि., एक पूर्णतः महिलांच्या मालकीची आणि महिलांनी चालवलेली कंपनी, हिच्यातर्फे कृषीकट्टा सेंद्रिय खत व कीटकनाशके विक्री केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामीण महिलांची ताकद, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक शेतीतून शाश्वत विकासाची संकल्पना ठळकपणे समोर आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि चाफा वृक्षारोपण याने झाली. पाहुण्यांचे स्वागत विविध प्रकारच्या जीवंत रोपटी देऊन करण्यात आले. ही स्वागत पद्धती पर्यावरणप्रेम आणि स्थानिक समृद्धतेचा आदर्श ठरली. उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत, ग्रामीण भागात महिला शेतकरी उत्पादक कंपनीने उभारलेले हे केंद्र एक ‘प्रेरणादायी मॉडेल’ असल्याचे मत व्यक्त केले.

Women Farmers
Farmer Women : शेतकरी महिला बोलणार शेतीमातीच्या हक्काबाबत; किसान सभेची शेतकरी महिला परिषद

या वेळी महा ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनीचे विनायक केळकर, कृषीकट्टा प्रतिनिधी नीलेश घरमाळकर, जितेंद्र आलासे, साक्षी चव्हाण, योग्यश्री भोसले, कैलास राठोड तसेच सहा जिल्ह्यांतील ३२ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियांका करपे, प्रास्ताविक चाफा कंपनीच्या संचालक पूजा वैष्णव, तर कृषीकट्टा केंद्र चालक मंगल कोलते यांनी केले.

‘कृषिकट्टा’ ही संकल्पना म्हणजे काय?

‘महा ऑरगॅनिक’ कंपनीच्या पुढाकाराने साकारलेली कृषीकट्टा सेवा केंद्र संकल्पना, पारंपरिक गावातील कट्टा किंवा पार यावर आधारित आहे. जिथे गावातील लोक अनुभव, माहिती, गप्पा, आणि सल्ला शेअर करतात. त्याच विचारातून कृषीकट्टा केंद्र पुढे आले आहे. पण शेती विषयक गरजा, माहिती आणि उत्पादनांचा पुरवठा यावर भर देत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com