Rural School : ग्रामीण शाळांचा आता होणार विकास

Rural Education : ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. शासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे विद्यार्थ्यांना या शाळांत पुरेशा भौतिक व शैक्षणिक सोई उपलब्ध करून देणे शक्य होत नाही.
Rural Education
Rural SchoolAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : ग्रामीण भागातील शाळांचा भौतिक व शैक्षणिक विकास साधण्याकरिता यापुढे लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार असून, त्यासाठी ‘एक हात दातृत्वाचा-मुलांच्या शिक्षणासाठी’ हे अभियान तालुक्यात राबविण्यात येत असल्याची माहिती भिवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांनी दिली.

डॉ. जाधव यांच्या अध्यक्षतेत तालुक्यातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांची संयुक्त सभा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. या सभेत या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. शासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे विद्यार्थ्यांना या शाळांत पुरेशा भौतिक व शैक्षणिक सोई उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. लोकांनी वर्गणीच्या माध्यमातून सहकार्य केल्यास शाळांची ही अडचण दूर होऊ शकते.

Rural Education
Education Quality: शिक्षण असावे ‘असर’दारच!

त्यासाठी सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन गावकरी, पालक, माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक संस्था, उद्योजक यांना ‘एक हात दातृत्वाचा- मुलांच्या शिक्षणासाठी’ या अभियानात सहभागी करुन घ्यायचे आहे.

रोखवर्गणी, क्रीडा साहित्य, संगीत साहित्य, पुस्तके इतर आवश्यक वस्तू शाळांना मिळवून देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. त्यातून शाळेत ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, क्रीडांगण, बगीचा, परसबाग, प्रयोगशाळा अशा सुविधा निर्माण करणे शक्य होणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

Rural Education
ZP School Education : विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार

सभेचे प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षण अधिकारी संतोष सोनटक्के यांनी, तर संचालन रुग्वेद भांडारकर यांनी केले. सहायक गटविकास अधिकारी विजय जिडगीलवार, सर्व केंद्र प्रमुख सभेला उपस्थित होते.

नक्षी, धामणगाव विद्या मंदिर, धामणगाव गवळी, अड्याळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून शाळेत केलेल्या विकासाबाबत उपस्थितांना माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com