Cotton Cultivation : आटपाडीत दोन हजार हेक्टरवर होणार कापसाची लागवड

Cotton Farming : आटपाडी तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून कापूस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत.
Cotton
CottonAgrowon

Sangli News : आटपाडी तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून कापूस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्याला कापसामुळे गतवैभव मिळले, अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या हंगामात दहा हजार बियाण्यांच्या पिशव्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून तालुक्याच्या पश्चिम भागात सुमारे दोन हजार हेक्टरवर कापसाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

आटपाडी तालुका कापूस उत्पादनासाठी लौकिक होता. मात्र, बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात कापसाचे पीक नामशेष झाले होते. कापसाच्या जागी डाळिंब पीक आले. त्यामुळे डाळिंब उत्पादन आणि निर्यातक्षम तालुक्याची नवी ओळख निर्माण झाली.

Cotton
Cotton Soybean Rate : मार्च अखेर राज्यात ९५ लाख टन साखरेचं उत्पादन | सोयाबीन-कापूस दरासाठी तहसीलवर आंदोलन | राज्यात काय घडलं?

दोन वर्षापूर्वी बाजार समिती आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तालुक्यात पुन्हा एकदा कापूस लागवडीसाठी नियोजन केले. आटपाडीच्या पश्चिम भागात खरसुंडी, नेलकरंजी, हिवतड, करगणी, आटपाडी, दिघंची, राजेवाडी, निंबवडे, बनपुरी, तळेवाडी, घरनिकी, घाणंद, झरे या भागात कापूस लागवड होत आहे.

बाजार समिती कृषी विद्यापीठाने पुढाकार घेत शेतकऱ्यांना कापसाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे शेतकरी कापूस लागवडीकडे वळला आहे. दोनशे एकरावर प्रायोगिक तत्त्वावर कापूस लागवड केली. यामध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही मिळाले.

Cotton
Cotton Productivity : बीडमध्ये जिरायती कापूस रुईची हेक्टरी ३४० किलो उत्पादकता

गतवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे पुरवले. सुमारे हजार ते बाराशे एकरावर कापसाची लागवड झाली. दर्जेदार बियाणे मिळाले. कापसाला अपेक्षित दरही मिळाले. त्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकरी पुन्हा कापूस लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कृषी दुकानात सुमारे १० हजार बियाण्यांचे पिशव्या विक्रीस ठेवल्या आहेत. यंदा दहा हजार पिशव्या बियाणे उपलब्ध केले असून दोन हेक्टरवर क्षेत्रावर कापूस लागवडीचे नियोजन केले आहे.

तालुक्यात कापसाची लागवड वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक कापसू बियाणे खरेदी करून त्याचे बिल घ्यावे.
मारुती कौगले, तालुका कृषी अधिकारी, आटपाडी, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com