Solapur Zoo : प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी १५ कोटींचा विकास आराखडा

Zoo development : शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी आता १५ कोटी १० लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
Solapur Zoo
Solapur ZooAgrowon
Published on
Updated on

Solapur News : शहरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या मान्यतेसाठी आता १५ कोटी १० लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्राण्यांसाठीच्या विविध सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समिती अथवा सीएसआर फंडातून निधी उभा करण्यासाठी दोन प्रस्ताव महापालिकेने तयार केले आहेत.

स्मॉल कॅटेगिरीतील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता केंद्रीय चिडिया घर प्राधिकरणाने २०१९ मध्ये रद्द केली. गेल्या सहा वर्षांपासून नागरिकांना या प्राणी संग्रहालात प्रवेश बंद करण्यात आला आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे ही स्थिती ओढवली आहे.

Solapur Zoo
Solapur Milk Union: सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त!

दरम्यान केंद्राच्या पथकाने केलेल्या पाहणी दरम्यान तब्बल ४२ त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याची पूर्तता न झाल्याने आजतागायत मान्यतेचा विषय प्रलंबित आहे. प्राणी संग्रहालयातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

Solapur Zoo
Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीच्या रणसंग्रामात भाजप विरूध्द भाजप लढतीची शक्यता

त्यातून सुरक्षा भिंत, प्राण्यांचे माहिती फलक, दिशादर्शक फलक आदी कामे करण्यात आली तर पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी दोन कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे.

१५ कोटींमध्ये ही कामे होणार

मगरीला अन्न खाण्यासाठीची स्वतंत्र खोली, पोस्टमार्टम खोली, बर्निंग शेड, काळवीट आणि सांबरसाठीची रुम, बोनेट व रेसेस माकड यांच्यासाठी नवीन पिंजरा, प्राण्यांसाठीचे पिंजरा दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, पाण्याची व्यवस्था आणि अर्धवट असलेले सुरक्षा भिंत आदी कामे केले जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com