Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीच्या रणसंग्रामात भाजप विरूध्द भाजप लढतीची शक्यता

APMC Election Update : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकहाती सत्ता मिळाली होती. बाजार समितीच्या आखाड्यात सात वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध भाजप असाच सामना होण्याची शक्यता आहे.
Solapur APMC Election
Solapur APMC Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. जून २०१८ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलमध्येच निवडणूक झाली होती.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकहाती सत्ता मिळाली होती. बाजार समितीच्या आखाड्यात सात वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध भाजप असाच सामना होण्याची शक्यता आहे.

त्यावेळी दोन्ही देशमुख मंत्री होते. आता एकही देशमुख मंत्री नाहीत. त्यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सिद्धाराम म्हेत्रे व प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचे दोन आमदार होते. आता या ठिकाणी सचिन कल्याणशेट्टी व देवेंद्र कोठे हे दोघे भाजपचे आमदार आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकारातून बाजार समितीची निवडणूक झाली. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेकांचा बाजार समितीत प्रवेश झाला.

Solapur APMC Election
Nashik APMC : अविश्वास ठरावानंतर संचालक परदेश दौऱ्यावर

यंदाची निवडणूक ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदारांमधून होणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सहकारात माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडे मतदारांची निर्णायक ताकद आहे. त्यामुळे हे दोघे कोणाकडे? यावर बरेच काही अवलंबून आहे.

Solapur APMC Election
Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात संपवा

दोन दिग्गज देशमुखांना मंत्रीमंडळात संधी मिळालेली नसताना विधिमंडळाच्या समिती अध्यक्षपदातून आमदार कल्याणशेट्टी यांना संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमध्ये सध्या कोण? याचा अंदाज येऊ लागला आहे.

अक्कलकोट विधानसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडीच जिल्हा परिषद गट असल्याने या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी यांची भूमिका महत्त्वाची व निर्णायक असणार आहे.

समितीची निवडणूक जिंकायची कशी? याचा चांगला दांडगा अनुभव आमदार कल्याणशेट्टी यांना दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीतून आला आहे. जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे, यासाठी भाजप आमदारांचा न झालेला मेळ, समितीच्या निवडणुकीसाठी तरी लागेल का? या बद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com