Jowar Crop Damage : चार एकरांतील शाळूवर फिरवला रोटर; २ लाखांपेक्षा अधिक नुकसान

Jowar Crop Damage Kolhapur : २५ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न निघाले असते. मात्र, वातावरणातील बदल, शेतीतील ओलावा यामुळे चार एकरांतील पिकावर त्यांनी रोटर मारला आहे". अशी खंत मादनाईक यांनी बोलून दाखवली.
Jowar Crop Damage
Jowar Crop Damageagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture Issue : कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसामुळे अजूनही जमिनीत ओलावा राहिल्याने शाळू पिकाची वाढ खुंटली आहे. पीक लालसर पडून करपू लागल्याने शिरोळ तालुक्यातील प्रकाश मादनाईक या शेतकऱ्याने ४ एकर शाळू पिकावर रोटर फिरवला. दर मिळत नसल्याने भाजीपाला पिकावर रोटर फिरवल्याचे प्रकार घडले आहेत. परंतु शाळू पिकावर देखील रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिरोळ तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

मादनाईक यांनी शेती भाड्याने कसण्यासाठी घेतली आहे. त्यांनी ४ एकर शेतीत शाळू पेरणी केली होती. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतात ओलावा टिकून होता. १ फूट पीकवर आल्यानंतर अचानक पिकाला गारवा लागला. यामुळे पाने लालसर होऊन पीक करपून गेले. औषध फवारणी आणि मशागतीचा खर्च प्रमाणापेक्षा जात असल्याने शेतकऱ्याने थेट आपल्या ४ एकर शेतावर रोटर मारून शेती रिकामी केली.

Jowar Crop Damage
Jowar, Maize Sowing : शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ, मक्याला पसंती; रब्बीमध्ये गहू आणि भातालाही शेतकऱ्यांची पसंती

शेतकरी प्रकाश मादनाईक म्हणाले की, "मशागत, बी-बियाणे, औषधे, मजुरी यासाठी तब्बल एकरी 40 हजार रुपयांप्रमाणे चार एकरांसाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च केले आहेत. पीकच हातचे निघून गेल्यामुळे आता पुन्हा शाळूची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. पीक चांगले आले असते, तर किमान २५ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न निघाले असते. मात्र, वातावरणातील बदल, शेतीतील ओलावा यामुळे चार एकरांतील पिकावर त्यांनी रोटर मारला आहे". अशी खंत मादनाईक यांनी बोलून दाखवली.

दोन लाखांचा फटका

भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी पिके रोटर मारून नष्ट करण्यात आली आहेत; पण निसर्गाची साथ न मिळाल्याने शाळूवर रोटर मारण्याची दुर्मीळ घटना जयसिंगपूर येथे घडली आहे. शिवाय भाड्याने शेती करण्यासाठी घेऊनही पदरी नुकसान पडल्याने मादनाईक यांना दोन लाखांचा फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com