Jowar, Maize Sowing : शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ, मक्याला पसंती; रब्बीमध्ये गहू आणि भातालाही शेतकऱ्यांची पसंती

Rabi Season Crop : देशातील रब्बीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली असून गेल्यावर्षीच्या लागवडीचा टप्पा पार झाला. देशात ३ जानेवारीपर्यंत ६२३ लाख हेक्टरवर रब्बीची लागवड झाली.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील रब्बीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली असून गेल्यावर्षीच्या लागवडीचा टप्पा पार झाला. देशात ३ जानेवारीपर्यंत ६२३ लाख हेक्टरवर रब्बीची लागवड झाली. गव्हाच्या पेरणी जवळपास साडेपाच लाख हेक्टरने वाढली.  गहू आणि मक्याची पेरणी सरासरीच्या पुढे गेली. हरभरा आणि भाताची लागवड गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर आहे. तर ज्वारीची लागवड साडेआठ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. 

देशात रब्बीचे सरासरी पेरणी क्षेत्र ६३५ लाख हेक्टर आहे. गेल्या पाच वर्षात रब्बी हंगामात झालेल्या लागवडी सरासरी म्हणजेच सरासरी क्षेत्र गृहीत धरले जाते. तर आतापर्यंत ६२३ लाख हेक्टरवर पेरा झाला. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत पेरणी जवळपास २ टक्क्याने अद्यापही पिछाडीवर आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरा २ लाख हेक्टरने (अर्धा टक्क्याने) आघाडीवर आहे. देशात यंदा भाताची लागवडही गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसत आहे. भाताची लागवडे गेल्यावर्षीपेक्षा जवळपास एक टक्क्याने अधिक आहे. ३ जानेवारीपर्यंत १७ लाख हेक्टरवर लागवड झाली. देशात भाताचे रब्बीतील क्षेत्र ४२ लाख हेक्टर आहे. 

Rabi Sowing
Rabi Sowing : आठ तालुक्यात रब्बीचा सरासरीहून अधिक पेरा

तेलबिया लागवड  ५ टक्के माघारली

शेवटच्या टप्प्यापर्यंत देशातील तेलबिया लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ५ टक्क्याने माघारलेली आहे. त्यातही मोहरीची लागवड जवळपास ६ टक्क्याने कमी दिसते. एकूण तेलिबिया लागवड जवळपास ९७ लाख हेक्टरवर पोचली. गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत जवळपास १०२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. तर मोहरीची लागवड ८८ लाख ५० हजार हेक्टरवर झाली होती.

Rabi Sowing
Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्‍बीत शंभर टक्के पेरणी

गव्हाचा पेरा सुधारला

गव्हाच्या पेरणीत यंदा चांगली वाढ झाली. गव्हाचे क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा तब्बल साडेपाच लाख हेक्टरने जास्त आहे. देशात ३ जानेवारीपर्यंत गव्हाची पेरणी जवळपास ३२० लाख हेक्टरवर झाली होती. गव्हाचा पेरा केवळ गेल्यावर्षीपेक्षाच नाही तर सरासरीपेक्षाही जास्त दिसत आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र ३१२ लाख हेक्टर आहे. म्हणजेच ३ जानेवारीपर्यंत देशात गव्हाचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास २ टक्क्याने तर सरासरीच्या तुलनेत अडीच टक्क्याने वाढला आहे. 

ज्वारीकडे पाठ,  मक्याला पसंती

देशात भरडधान्याचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा सव्वाटक्याने कमी दिसत आहे. जवळपास ५२ लाख हेक्टरवर पेरणी झाली. त्यातही ज्वारीचे क्षेत्र ८.२० टक्क्याने पिछाडीवर दिसत आहे. ज्वारीचा पेरा जवळपास २३ लाख हेक्टरवर झाला. मक्याची लागवड ८.४० टक्क्यांनी अधिक आहे. मक्याची लागवड २२ लाख हेक्टरवर पोचली. देशात रब्बीचे मक्याचे सरासरी क्षेत्र २२ लाख हेक्टर आहे. म्हणजेच यंदाची लागवड ३ जानेवारीपर्यंत सरासरी क्षेत्रावर पोचली होती. 

हरभरा दीड टक्क्याने आघाडीवर

देशात हरभऱ्याची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दीड टक्क्याने आघाडीवर दिसत आहे. मात्र देशातील सरासरीपेक्षा मात्र जवळपास ७ टक्क्याने पिढाडीवर आहे. ३ जानेवारीपर्यंत देशात ९४ लाख ४५ हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली. तर देशात सरासरी क्षेत्र १०१ लाख हेक्टर आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com