Soybean Crop : चार एकरावरील सोयाबीन पिकावर फिरवला रोटाव्हेटर

Soybean Disease : आशिष पाटील या शेतकऱ्याची शेतीवर संपूर्ण भिस्त असताना यावर्षी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता.
Soybean Crop
Soybean CropAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : तालुक्यात सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक, खोड किडीसह बुरशीजन्य रोगाने आक्रमण केले आहे. या आक्रमणामुळे अचलपूर तालुक्यातील असदपूर निंभारी येथील त्रस्त झालेल्या आशिष पाटील या शेतकऱ्याने आपल्या उभ्या चार एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला.

आशिष पाटील या शेतकऱ्याची शेतीवर संपूर्ण भिस्त असताना यावर्षी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. चार एकरमधील पिकाची पाहणी केल्यानंतर हाती काहीच येणार नाही असे स्पष्ट झाले. त्यामुळे हतबल झालेल्या पाटील यांनी रोटाव्हेटर चालवून संपूर्ण पीक काढून टाकले.

Soybean Crop
Soybean Crop Damage : सोयाबीनसह जिल्हा कचेरीवर धडक

शेतातील उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालवतावेळी शेतकऱ्याचे दुःख अनावर झाल्याने त्याचे डोळे पाणावले होते. विशेष म्हणजे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. मात्र त्याच्यावर अशा प्रकारचे संकट पहिल्यांदाच आल्याने त्यांचे दुःख अनावर झाले.

Soybean Crop
Soybean Crop Damage : ...अखेर पालकमंत्री विखे पाटील पोचले बांधावर

यासंबंधी लोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी, कृषी प्रशासन, तलाठी, मंडल अधिकारी यांनी तातडीने पंचनामा करून मदतीसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आशिष पाटील, संजय बोचरे, दीपक जैस्वाल, शरद शर्मा, जयेश संघवी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शेतीवर संपूर्ण भिस्त असताना यावर्षी पिके हातची गेली. आता काय करावे, हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला होता. चार एकरमधील पिकाची पाहणी केल्यानंतर हाती काहीच येणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर रोटाव्हेटर चालवून संपूर्ण पीक काढून टाकले. शासनाने तत्काळ मदत करावी जेणेकरून पुढील पीक घेण्यासाठी मदत होईल.
- आशिष पाटील, शेतकरी.
शासनाकडून पंचनामे करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार पंचनामे सुरू आहेत. जवळपास तालुक्यातील पन्नास टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.
- प्रवीण मडघे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, अचलपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com