Soybean Crop
Soybean CropAgrowon

Soybean Crop Damage : ...अखेर पालकमंत्री विखे पाटील पोचले बांधावर

Radhakrishna Vikhe Patil : जिल्ह्यात खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झालेले असल्याने गेले काही दिवस विरोधकांच्या टीकेचा धनी ठरलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी (ता. २२) अखेर जिल्हा दौऱ्यावर आले.
Published on

Akola News : जिल्ह्यात खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झालेले असल्याने गेले काही दिवस विरोधकांच्या टीकेचा धनी ठरलेले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी (ता. २२) अखेर जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी जिल्ह्यात आल्यानंतर शिवापूर शेतशिवारात सोयाबीन पिकाला शेंगा न लागलेल्या शेतांना भेट देत याविषयी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली.

यंदाच्या खरीप हंगामात सातत्याने झालेल्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरपर्यंत पिके बाधित झालेली आहेत. अशा संकटाच्या काळात पालकमंत्र्यांनी बांधापर्यंत येण्याची शेतकरी मागणी करीत होते.

Soybean Crop
Soybean Farming : सोयाबीनचे मोठे क्षेत्र ठरतेय वांझोटे

मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री विखे पाटील हे जिल्ह्यात प्रत्यक्ष दाखल आलेलेच नव्हते. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध टीकाही केली. एका आमदारांनी त्यांना पालखीत बसून बांधावर नेऊ असेही जाहीर केले होते.

Soybean Crop
Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

दरम्यान रविवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विखे पाटील यांनी सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीच्या समारोपीय कार्यक्रमाला हजेरी दिली. त्यानंतर लगेच नुकसानग्रस्त भागात पिकांची पाहणी करण्यासाठी यंत्रणांसह पोचले. या वेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी शिवापूर येथे गजानन जळमकार यांच्या शेतात भेट दिली. या वेळी नुकसानग्रस्त गजानन भारसाकळे व इतर शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांना शासनाने, विमा कंपनीने तातडीने मदत द्यायला हवी, अशी मागणीही या वेळी केली. या बाबत तातडीने प्रस्ताव देण्याबाबत मंत्र्यांनी सूचना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com