Crop Insurance : आधार, पासबूक, सातबारावरील नावात थोडा बदल असला तरीही विम्यावर पाणी फिरणार? काय आहे शासनाने बदललेला नियम?

Agriculture Insurance Update : सरकारने पीकविमा योजना आधार संलग्न करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे आपल्या आधारकार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरणे आवश्यक आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrown

Pune News : सरकारने पीकविमा योजना आधार संलग्न करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे आपल्या आधारकार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरणे आवश्यक आहे. तर आधारवरील नावाची नोंद आणि सातबारावील नोंदीत मोठी तफावत नसावी. यासाठी सरकारने अशी तफावत असेल तर दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे. पण सोशल माध्यमांमध्ये भीती निर्माण करणारे संदेश फिरत आहेत. 

सध्या व्हाॅट्सअपवर फिरणारा मॅसेज असा की, यावर्षी खरिप विमा भरताना नविन नियम आला आहे. शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, पासबूक आणि सातबारावरील नावात थोडा जरी बदल असेल तर विमा अर्ज फेटाळला जाणार आहे. राम ऐवजी रामराव, बालाजी ऐवजी बाळासाहेब, कासिम ऐवजी काशिम असे अनेक उदाहण देण्यात आली. तसेच आपल्या किंवा वडिलांच्या किंवा आडनावात बदल असतील तर ते बरोबर करून घ्यावेत. नाहीतर विम्याचे फाॅर्म मंजूर होणार नाहीत, असेही म्हटले आहे. 

Crop Insurance
Banana Crop Insurance : फळ पीकविमा योजनेत केळी विमाधारकांवर अन्याय

हा मॅसेज ज्यांच्या ज्यांच्या मोबाईलवर आला त्या सर्वांच्या मनात भीती आली की आपलं नाव बरोबर तर आहे ना. त्यामुळे शेतकरी लगेच सीएसी केंद्र, बॅंक आणि तलाठ्याकडे जाऊन आपल्या नावाची शहानिशा करत आहेत. ऐन खरिपाच्या कामात आमच्या मागं हे काय लचांड लावलं, असा रोषही शेतकऱ्यांमध्ये आहे.  

सरकारने निर्णय घेतला की, पीकविम्याचा अर्ज भरताना तुमचे आधारकार्डवरील नावाप्रमाणेच अर्ज भरावा. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर आडनावाने सुरुवात झाली असेल तर अर्ज भरताना आडनावानेच सुरुवात करावी. आधारकार्डवर तुमच्या नावाने सुरुवात असेल तर तसा अर्ज भरावा, हा महत्वाचा बदल आहे. आधारप्रमाणे तुम्ही नाव टाकले नाही तर अर्ज बाद होऊ शकतो. हे झालं आधार प्रमाणे अर्ज भरण्याचं की जे अत्यंत महत्वाचे आहे. 

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा कंपन्यांचा १९ हजार शेतकऱ्यांना ठेंगा

दुसरं म्हणजे सातबारा आणि आधारवरील नाव सारखे असणे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाचे अनुदानही आता आधार संलग्न खात्यात जमा होत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे नाव आधारप्रमाणे आहेत. फक्त काही शेतकरी असू शकतात की ज्यांची नावे वेगळी असतील. पण हे शेतकरी गॅझेट आणि शपथपत्र देऊन सातबाऱ्यावरील नाव आधारप्रमाणे करू शकतात. आता काही वयस्कर शेतकरी आहेत की ज्यांचे थंब आधार घेत नाही. त्यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही समस्या आधारची आहे. महसूल, कृषी विभाग किंवा पीकविम्याची नाही. सातबारा आणि आधारवरील नावात पूर्ण बदल नसेल तर काही अडचण येणार नाही. नाव संपूर्ण वेगळेच असेल तर ते मात्र बदलावे, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

तिसरे आहे बॅंक पासबूक. तर पीकविम्याचा अर्ज भरताना आधार संलग्न बॅंक खाते असलेला नंबर द्यावा. बॅंकेत केवायसी केलेल्या जवळपास पूर्ण शेतकऱ्यांचे नाव आधार प्रमाणे आहे. त्यामुळे पासबुकवरील नावाची तेवढी अडचण नाही. 

आता कृषी विभागाने हा निर्णय का घेतला? तर मागच्या काही वर्षांमध्ये विमा योजनेत अनेक गैरप्रकार वाढले होते. काही शेतकऱ्यांचा विमा परस्पर लाटला जात होता. तसेच अनेक गैरप्रकार घडत होते. याला चाप लावण्यासाठी पीकविमा योजनेत मानवी हस्तक्षेप कमी करून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे उद्दीष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने पीकविमा योजना आता आधार संलग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच पीकविमा अर्ज  भरताना आधारप्रमाणे भरावा लागणार आणि नुकसानीची रक्कमही आधार संलग्न खात्यातच जमा होणार.

हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे की, कुणालाही तुमच्या नावावर परस्पर विमा काढून गैरप्रकार करता येणार नाही.  केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या विमा दाव्यावर काय निर्णय घेतला याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक महत्वाचा आहे. तसेच पीकविमा अर्ज भरताना आधारचा सर्व्हर, महसूलचा सर्व्हरमधून जावे लागते. त्यामुळे सर्व माहीती सारखी असणे आवश्यक आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com