Maharashtra Agriculture: शेतीमधील मनुष्यबळ कमी करणे गरजेचे: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

Agriculture Minister Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, शेती नफा देणारी ठरवायची असेल, तर मानवविरहित तंत्रज्ञानाधारित शेती (AI आधारित) हाच पर्याय आहे.
Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीसाठी आमचे प्रयत्न आहेत. जोवर मानवविरहित शेती केली जाणार नाही तोवर ती फायद्यात राहणार नाही. यासाठी ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) माध्यमातून शेतीमध्ये प्रयोग केले जातील, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंगळवारी (ता. १) सायंकाळी कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री कोकाटे बोलत होते. या वेळी ‘ॲग्रोवन’चे प्रतिनिधी मनोज कापडे यांना कृषी पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. कापडे यांनी सपत्नीक पुरस्कार स्वीकारला. यासह अन्य १६ कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Agriculture Minister Manikrao Kokate
AI In Farming: ‘वारणा’ ५०० एकरांवर वापरणार ‘एआय’ तंत्रज्ञान

या वेळी कोकाटे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात जिव्हाळा फुलविण्याचे आणि आर्थिक प्रगती आणण्याचे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. त्यांनी दुष्काळात सुरू केलेली रोजगार हमी योजना केंद्र सरकारने स्वीकारली. तर अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय आजही पथदर्शी आहेत. या पुढील काळात तंत्रज्ञान आधारित शेती करणे गरजेचे आहे.

जोवर शेतीतील मनुष्यबळाचा वापर कमी करत नाही तोवर आपल्याला शेती फायद्यात आणता येणार नाही. या आधी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्महत्या होत नव्हत्या. मात्र, अलिकडे सामाजिक वीण उसवल्याने आणि शेतीतील खर्च वाढल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. या पुढील काळात आपल्याला रासायनिक खतांचा बेसुमार वापर टाळून विषमुक्त शेती केली पाहिजे. आपण किती पिकवतो यापेक्षा कोणत्या दर्जाचे पिकवतो यावर आपला भर असला पाहिजे.’’

Agriculture Minister Manikrao Kokate
AI Policy in Agriculture: ‘एआय’ धोरणाला पुढे नेण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालयाकडे

या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले म्हणाले, ‘‘हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सतत ४० वर्षे कृषी क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यांनी राबविलेले अनेक उपक्रम देशपातळीवर स्वीकारले गेले. ज्या शेतकऱ्यांनी चांगले काम केले आहे, त्यांना सन्मानित केले आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगाचा मोठा फायदा राज्यातील इतर शेतकऱ्यांना होईल. आधुनिक तंत्रज्ञानातून जगाची अन्नसुरक्षा निश्चित करता येऊ शकेल.’’

यांचा झाला सन्मान

या वेळी विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्र गडचिरोलीला एक लाखाचा सामाईक पुरस्कार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांना उल्लेखनीय योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या व्यतिरिक्त कृषी शास्त्रज्ञ व साहित्य पुरस्कार : डॉ. दिलीप घोष, कृषी निर्यात पुरस्कार : उळे शेतकरी उत्पादक कंपनी, फलोत्पादन पुरस्कार : हनुमंत गावडे,

भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार : नानाजी जाधव, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार : भाऊसाहेब भोसले, जलसंधारण पुरस्कार : उपेंद्र धोंडे, आधुनिक फुलशेती पुरस्कार : गणेश वाघ, आधुनिक स्टार्टअप पुरस्कार : महेक अली आणि सय्यद अली, सामाजिक वनीकरण पुरस्कार : शेखर गायकवाड, महिला केंद्रित ग्राम विकास पुरस्कार : इंदुजा महिला दुग्ध उत्पादक कंपनी, पुनर्जिवित शेती पुरस्कार : रामचंद्र पुंड, नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार : रोहन उरसाल, कृषी प्रक्रिया पुरस्कार : विनोद जोगदंड यांना प्रदान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com