ED Inquiry : रोहित पवार यांची सहा तास चौकशी

MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सहा तासांहून अधिक काळ बुधवारी (ता. २४) सक्तवसुली संचलनालयाने चौकशी केली.
Rohit Pawar
Rohit PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची सहा तासांहून अधिक काळ बुधवारी (ता. २४) सक्तवसुली संचलनालयाने चौकशी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पवार यांची चौकशी सुरू होती.

दरम्यान, चौकशीला जाण्याआधी रोहित पवार यांनी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी पवार यांनी रोहित यांना यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र भेट दिले. तर सुप्रिया सुळे यांनी संविधानाची प्रत भेट दिली.

Rohit Pawar
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची कृषिक प्रदर्शनला भेट

रोहित पवार चौकशीला जाण्याआधी आणि नंतरही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना साथ दिली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह अन्य नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित राहत त्यांना पाठिंबा दिला.

बारामती ॲग्रो आणि त्याच्याशी संबंधित कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पवार यांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य करू असे सांगत चौकशीला सामोरे गेले.

Rohit Pawar
Rohit Pawar : रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; आज ईडीची चौकशी; शरद पवार गटाचे जारदार शक्तीप्रदर्शन

बुधवारी बलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सकाळी रोहित यांच्यासमवेत आमदार संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा उपस्थित होते. दरम्यान, ‘राष्ट्रवादी’च्या कार्यालयात जाऊन रोहित यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या वेळी काही काळ त्यांचा संवाद झाला. या वेळी पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र भेट देऊन त्यांना लढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

ईडी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची गर्दी

ईडी कार्यालयासमोर शरद पवार गटाचे आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनीही दिवसभर ठाण मांडले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com