Agriculture Irrigation : रिटेवाडी योजना सुरू करणारच

Ritewadi Irrigation Scheme : गट-तट बाजूला ठेवून तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची ताकद द्या, रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करून दाखवणार, अशी खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी पोथरे येथील सभेत बोलून दाखवली.
MLA Narayan Patil
MLA Narayan PatilAgrowon
Published on
Updated on

Solapur Ness : गट-तट बाजूला ठेवून तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची ताकद द्या, रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करून दाखवणार, अशी खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी पोथरे येथील सभेत बोलून दाखवली.

जनसंवाद गावभेट दौऱ्यात करमाळा तालुक्यातील पोथरे या ठिकाणी माजी आमदार नारायण पाटील यांनी भेट दिली. यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी ईश्वर वाळुंजकर होते तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे, सभापती अतुल पाटील, बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल, नामदेव शिंदे, संतोष वाळुंजकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

MLA Narayan Patil
Agriculture Irrigation : चणकापूर-झाडी कालव्याला लवकरच पाणी सोडणार

माजी आमदार पाटील म्हणाले, २०१४ ते १९ च्या पंचवार्षिक कालावधीमध्ये किती विकासकामे झाली आणि २०१९ ते २४ च्या पंचवार्षिक कालावधीमध्ये किती विकासकामे झाली याचा ताळेबंद आता जनता करत आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात शेतीसाठी वीज व पाण्याची मागणी वाढत चालली आहे. उजनी धरण उशाला असून आजही जवळपास एक लाख एकर क्षेत्र जिरायत म्हणून पावसावर अवलंबून आहे, ही बाब चिंताजनक असून, हरितक्रांती करून दाखवण्यासाठी मला सत्ता हवी आहे.

MLA Narayan Patil
Agriculture Irrigation : शेतीला पाणी मोजून कसे देणार?

यावेळी पाटील यांनी पोथरे परिसरातील वाडी- वस्तींना भेटी दिल्या. पोथरे ते पोटेगाव हा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त असून, आमची दळणवळणाची गैरसोय होत असल्याची व्यथा नागरिकांनी बोलून दाखवली. माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी करत लोकांची व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या.

सहा बंधारे मंजूर असून येथे काम होत नाही. करमाळा तालुक्यातील प्रशासनावर कोणाचा वचक उरला नसल्याने अधिकारी उलट उत्तरे देऊन माघारी लावत आहेत, अशी व्यथा नागरिक या वेळी माजी आमदार पाटील यांच्यासमोर व्यक्त करत होते. या वेळी पाटील यांनी आपण स्वतः जातीने या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com