Agriculture Irrigation : शेतीला पाणी मोजून कसे देणार?

Irrigation Issue : मीटर पद्धतीने पिण्याला पाणी मोजून देऊ शकत नाही, मग शेतीला कसे देणार? असा सवाल आमदार अरुण लाड आणि शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ६) जलसंपदा विभागाच्या बैठकीत केली.
Agricultural Irrigation
Agricultural IrrigationAgrowon
Published on
Updated on

Sangli News : मीटर पद्धतीने पिण्याला पाणी मोजून देऊ शकत नाही, मग शेतीला कसे देणार? असा सवाल आमदार अरुण लाड आणि शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ६) जलसंपदा विभागाच्या बैठकीत केली. अपर मुख्य सचिवांनी येत्या १५ दिवसांत हा मुद्दा वरिष्ठ पातळीवर मांडून लवकरच बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिले.

सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे सिंचन मंडळ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक झाली. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशन सांगली जिल्हाध्यक्ष जे. पी. लाड, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील प्रमुख उपस्थित होते.

अरुण लाड म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी किती उचलले याचा हिशेब नाही. आम्ही बंद पाइपलाइन आणि ठिबकने पाणी देऊन ते वाचवतोय. लोकल फंड दुबार न आकारता जो एकदा देतोय तोही बंद झाला पाहिजे. नियमित बिले योग्य पद्धतीने करून द्यावीत, मगच मीटर बदलावेत.

Agricultural Irrigation
Agriculture Irrigation : रब्बी, उन्हाळी हंगामांसाठी उचलले २६ टीएमसी पाणी

आजही चुकीची बिले शेतकऱ्यांना दिली जाताहेत. शासकीय २३ उपसा सिंचन योजनांना आधी मीटर बसवा, ते किती शक्य आहे बघा, मग शेतकऱ्यांच्या योजनांकडे या. ज्या संस्थांनी वाढीव दहापटीने बिले भरली नाहीत त्यांना दंडाच्या रकमेसह बिले आली आहेत. ती बिले कमी करा.

डॉ. पाटणकर म्हणाले, की शेतकऱ्यांवर अन्यायकारक अटी लावल्या जात आहेत. उरमोडी, ताकारी धरणातून बरेच पाणी वाया जातेय. शासकीय योजनांना वीजबिल आकारणी ८१-१९ पद्धतीने होते, तीच पद्धत सहकारी उपसा सिंचन योजनांना लावण्यात यावी. जे शेतकरी प्रामाणिकपणे बिले भारतात त्यांनाच शिक्षा केली जात आहे.

Agricultural Irrigation
Agriculture Irrigation : ‘कुकडी’चे आवर्तन सुटले

अपर सचिव दीपक कपूर म्हणाले, की भविष्यात सर्व योजना बंद पाइपलाइनद्वारेच होतील. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनांवर पाणी वापर संस्था सुरू केल्या जातील. यासाठी स्थानिकांनी मदत करावी. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच दहापट वीज दरवाढ करणे गरजेचे होते.

ज्या योजना शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी उभा केल्या आहेत, त्यावर अचानक एवढी वाढ करणे अयोग्य आहे. मीटरचा मुद्दा योग्य नाही. महावितरण कमी पडते आहे. याबाबत या विभागाच्या सचिवांशी चर्चा करू. सरकार दरबारी भूमिका स्पष्टपणे मांडू. येत्या १५ दिवसांत यावर शासन आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. रत्नाकर तांबे, अतुल पाटील, जे. बी. पाटील, विजय पाटील, किशोर पावशे, धनाजी पाटील, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com