Agriculture Irrigation : चणकापूर-झाडी कालव्याला लवकरच पाणी सोडणार

Chankapur-Jhadi-Erandgaon Canal : चणकापूर-झाडी-एरंडगाव कालवा पूर्णत्वासाठी उपोषणाला बसलेले हरसिंग ठोके यांनी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर दोन दिवसांनी गुरुवारी (ता. १३) उपोषण मागे घेतले.
Chankapur-Jhadi-Erandgaon Canal
Chankapur-Jhadi-Erandgaon CanalAgrowon

Nashik News : चणकापूर-झाडी-एरंडगाव कालवा पूर्णत्वासाठी उपोषणाला बसलेले हरसिंग ठोके यांनी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर अखेर दोन दिवसांनी गुरुवारी (ता. १३) उपोषण मागे घेतले.

लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या वेळी कालवा पूर्णत्वाचे स्वप्न दाखवून राजकीय नेत्यांना मतांसाठी हक्कांचा मुद्दा झाला आहे. त्यावर लोकप्रतिनिधी राजकीय पोळी भाजून घेतात. परंतु, फक्त आश्वासने मिळत असल्याने व प्रत्यक्ष कुठलीही कार्यवाही होत नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी सांगवी येथे बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते.

Chankapur-Jhadi-Erandgaon Canal
Canal Leakage : टंचाईच्या झळांना कालवा गळतीची धार

सांगवी गावातील भूमिपुत्र हरसिंग ठोके यांनी देवळा तालुक्यातील पूर्व भागातील उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वाहाने, पिंपळगाव (वा.), खुटेवाडी, वाखारी, मेशी, दहीवड, खडकतळे, खारीपाडा, एरंडगाव आदी गावांतील लोकांच्या मदतीने लढा उभारून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. कुठलेही ठोस व लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.

याप्रसंगी हरसिंग ठोके यांच्यासमवेत येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवरे, उमेश देवरे, संदीप देवरे, सांगवीचे सरपंच रवींद्र अहिरे, शेखर पगार, गोरख केदारे, दत्ता जाधव, संजय चव्हाण, सतीश ठाकरे, रवींद्र पवार, मिलिंद शेवाळे, भगवान देवरे, बाळा पवार आदी शेतकरी उपस्थित होते. अखेर दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या वतीने या उपोषणाची दखल घेण्यात आली.

Chankapur-Jhadi-Erandgaon Canal
Agriculture Irrigation : ‘कुकडी’चे आवर्तन सुटले

सद्यःस्थितीत कालव्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे चणकापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर लवकरात लवकर पूरपाणी टेस्टिंगसाठी झाडी धरणात पोहोचविणार आहे. त्याचबरोबर आर्थिक मोबदल्यापासून वंचित जमीन मालकांना लवकरात लवकर मोबदला दिला जाईल. कालवा रुंदीकरण व अस्तरीकरणासाठी शासन दरबारी संयुक्तिक प्रयत्न करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ठोके यांनी कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेऊन उपोषण सोडले.

याप्रसंगी उपविभागीय अभियंता मिलिंद पालवे, कनिष्ठ अभियंता विकास धनगर, राज्य काँग्रेस कमिटी सदस्य दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडित निकम, सांगवीचे सरपंच रवींद्र अहिरे, उमराणेचे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मिलिंद शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत देवरे, वालचंद देवरे, वऱ्हाळेचे सरपंच नामदेवराव खैरनार, माजी पंचायत समिती उपसभापती धर्मा देवरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन अहिरे, भरत देवरे, मेशीचे सरपंच बापू जाधव, भिला गुंजाळ, छबू ठोके, मोहन देवरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com