Road Safety : घाट प्रवासातील अपघाताचा धोका होणार कमी

राजेंद्र लडकत यांच्या संशोधनामुळे वाहने दरीत कोसळण्यापासून बचाव शक्य
Road Safety
Road SafetyRoad Safety

घाटात अवघड वळणांवर वाहनांवरील ताबा सुटून ती दरीत कोसळण्याच्या (Accident In Ghat Area) घटना वारंवार घडतात. यावर ‘न्यूटनच्या गतीविषयक सिद्धांता’चा आधार घेत पुणे शहरातील मुंढवा परिसरातील अभियंते राजेंद्र लडकत (Rajendra Ladkat) यांनी एक उपाय शोधला आहे. त्यांच्या या संकल्पनेला भारत, अमेरिका, जपान, चीन व ऑस्ट्रलियाचे पेटंट मिळाले आहे. या संकल्पनेचा वापर केल्यास भविष्यामध्ये घाटामधील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Road Safety
Agriculture Value Chain : कृषिमूल्य साखळीच्या विकासासाठी धोरणात्मक स्थैर्य हवे

गिरवलीतील डोंगरावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याची घटना नुकतीच घडली. अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडतात. त्या टाळण्यासाठी काय करता येईल, यासाठी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात वीस वर्षांपासून काम करणारे अभियंता राजेंद्र लडकत यांचा विचार सुरू होता.

त्यांनी न्यूटनच्या जडत्वावर आधारित या सिद्धांताचा उपयोग करीत ‘प्रीकास्ट ‘H’, ‘Y’ ब्लॉक विथ रोप’ या पद्धतीचा वापर करीत एक मॉडेल बनविले आहे. त्याच्या चाचण्या सध्या घेतल्या जात आहे. लखनौ येथे ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या परिषदेमध्ये या कामाचे सादरीकरण केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राजेंद्र लडकत यांनी सांगितले.

अशी सूचली कल्पना

उत्तराखंड येथील महापूरबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी अमर उजाला फौंडेशनचे काम सुरू आहे. तिथे आपत्ती व्यवस्थापन साहित्य पुरवण्याचे काम राजेंद्र यांना मिळाले. यातील रेस्क्यू कीट आणि छोटे बहुउपयोगी स्ट्रेचर याचेही पेटंट राजेंद्र यांच्याकडे आहे. शंभर आपत्कालीन किट व स्ट्रेचर घेऊन तेथील स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी राजेंद्र आणि संस्थेचे प्रतिनिधीसह तेथील चार जिल्ह्यामध्ये पंधरा गावापर्यंत प्रवास करावा लागला.

मात्र कोणत्याही आपत्तीनंतर ज्या प्रमाणे रस्ते, घाटरस्ते खराब अवस्थेत असतात, तशीच स्थिती येथील आपत्तीच्या वर्षानंतरही होती. त्यामुळे संपूर्ण प्रवास हा जीव मुठीत घेऊन करावा लागला. घाटरस्त्यातील वळणे व त्यावरील अपघात कमी कशा प्रकारे करता येतील, यावर राजेंद्र यांचा विचार सुरू झाला. त्यातूनच ही एक प्रीकास्ट H व Y ब्लॉक ची कल्पना सुचली .

काय आहे मॉडेल?

Y ब्लॉक एकावर एक ठेवल्यास सरळ उभी भिंत, H ब्लॉक एकात एक अडकवत गेल्यास तिरकी भिंत बांधता येते.

या H व Y ब्लॉकमधून असलेल्या पोकळीतून वायर रोप ताणून नेली जाते.

-पुढे हीच वायर रोप जमिनीच्या खालून रस्त्याच्या विरुद्ध बाजूपर्यंत ताणून नेला जातो. तिथे (डोंगराच्या बाजूला) दोन ते तीन फूट लांबीचे खिळे (नेल) घट्ट बांधले जातात.

-हे वायर रोप जमिनीच्या भूसभुशीतपणा आणि अन्य बाबींचा विचार करून दर सहा ते दहा फूट अंतरावर एक या प्रमाणे ताणलेले असतात. त्यामुळे या भिंतीवर गाडी अपघाताने आदळली तरी त्याचा संपूर्ण आघात एकाच जागी पडण्याऐवजी सर्वत्र विभागला जातो.

- यातील ब्लॉकही आकाराने मुद्दाल लहान केले आहेत. त्यामुळे त्यांचीही ताकद अधिक राहते.

- भिंतीवर सरळ आघात होऊ नये, यासाठी ट्रकचे मोठे टायर वरील बाजूला, तर खालील बाजूला कारचे लहान टायर लावण्यात येतात. त्यामुळे अपघातामधील आघात कमी होतो.

Road Safety
Agriculture Drone : सुधागडात ड्रोनमार्फत खते फवारणीचे प्रात्यक्षिक

- H व Y आकाराचे ब्लॉक फॅक्टरीत बनविल्यास हे काम एका दिवसात पूर्ण होते.

- रोलिंगची पद्धत कमी खर्चिक असून तीन फुटांसाठी २० ते २५ हजार रुपये खर्च येतो.

- वाहनाचा वेग व वजन कितीही असले तरी स्टीलच्या रोपची जाडी वाढवून ते सहज पेलता येते. कारण, स्टीलचा रोप कित्येक टन वजन सहज पेलू शकतो व तो लवचिक असतो

- जर जमीन ठिसूळ असल्यास किंवा मातीचा पोत हलका असल्यास तेथे कॉंक्रिटचे हलके ब्लॉक व स्टील फायबरचा वापर केला जातो.

- या संकल्पनेच्या पेटंटसाठी २०१३ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्याचे भारतीय, अमेरिका, जपान, चीन व ऑस्ट्रलिया येथील पेटंट मिळालेले आहेत. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग रिसर्च येथील सुदर्शन बोबडे यांनीही या संकल्पनेवर अभ्यास करत नुकतीच पीएच.डी. मिळवली आहे.

Road Safety
Modern Agriculture : प्रशिक्षणांती किफायतशीर शेती

अशी झाली आंबेळी घाटातील चाचणी ..

रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबेनळी घाटातील बाउली या गावानजिकच्या वारंवार अपघात होणारा एक वळणावरचा भाग चाचणीसाठी दिला. कारण येथे नुकताच एक ट्रक दरीत पडून दोनजणांचे प्राण गेले होते. तसेच सतत छोटेमोठे अपघात होतात. मार्च २०२२ मध्ये कामाला सुरवात केली. सर्वेक्षणामध्ये या रस्त्याखाली असलेल्या ब्रिटिशकालीन नाल्यामुळे रस्त्याला आवश्यक तितकी ताकद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले.

रस्ता अरुंद असल्याने नाल्याचा भाग पाच फुटांनी वाढवून त्यावर संरक्षित भिंत बांधण्याचे ठरले. तेथील नैसर्गिक रचनेला धक्का न लावता वाढवलेल्या नाल्यावर इंग्रजी I आकाराची कॉंक्रिटची भिंत बांधली. त्यावर साडेतीन फूट उंचीचे काँक्रिटचे H ब्लॉक ठेवले. त्यावर अडीच फूट उंचीचे Y ब्लॉक ठेवले. या H व Y ब्लॉक मधून असणाऱ्या होलमधून वायर रोप ताणून घेतले. त्यांना दोन्ही बाजूला नेलच्या साहाय्याने आधार दिला. रोडच्या कडेला तुटलेल्या रेल गार्डच्या पुढे JCB च्या साहायाने आठ H ब्लॉक जमिनीत एक फूट खड्डा करून ठेवले.

त्यामधून लोखंडी ३ इंच व्यासाचा पाईप दोन फूट जमिनीत खोचला. त्यावर कॉंक्रिटचा १७ इंच व्यासाचा गोल बसविला. त्याभोवती मोठा टायर ठेवला. दोन ब्लॉकमध्ये रेलगार्डचे निघालेले C चॅनेल उभे खोचले. आठ H ब्लॉक व चार C चॅनेलमधून स्टीलचे वायर नेऊन रस्त्याच्या बाजूला नेलच्या साहायाने ताणून बसवले. त्याचप्रमाणे H ब्लॉक वरील टायर वर असणाऱ्या पाईपच्या होलमधून वायर रोप नेऊन तो देखील दोन्ही बाजूला नेल केला.

H ब्लॉक वर असणारे मोठे टायर मोठा गाड्यांचे आघात सहन करण्यासाठी तर H ब्लॉक पुढे लावलेले छोटे टायर छोट्या गाड्यांसाठी अशी रचना आहे. अशा प्रकारे सध्या तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या रेल गार्डच्या पुढे H आकाराची इम्पॅक्ट रेझिस्ट वॉल व मागील बाजूस H व Y ब्लॉक वापरून उभी रिटेनिंग वॉल तयार करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com