Nanded Water Scarcity : ऊन सोसल, पण तहान कशी भागवायची?

Water Crisis : भूगर्भातील पाणी पातळी वाढण्ययासाठी शासनाने पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण सारखी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली तरी टंचाई काही हटता हटेना.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Nanded News : पाणीटंचाई तालुक्याच्या नशिबी पाचवीलाच पुजलेली असल्याचा अनुभव भोकर तालुक्यातील १६ गावे, वाडी, तांड्यातील नागरिकांनी भीषण पाणीटंचाईमुळे येऊ लागला आहे.

सिंचनाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष देवून साडेसात कोटींची ग्रीड योजना सुरू केली. परंतु. त्याचे काम कासवगतीने होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात त्याचा लाभ घेण अशक्य असल्याने गोड बातमी सध्यातरी कडू वाटत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : वारवंड परिसरात तीव्र पाणीटंचाई

घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्ययासाठी शासनाने पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण सारखी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली तरी टंचाई काही हटता हटेना.

Water Scarcity
Water Scarcity : दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा

उन्हाची काहिली होताच तालुक्यात १६ गावे आणि वाड्या-तांड्यांवर ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्व कामधंदा सोडून महिला, पुरुष, मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील जनतेचा हा वनवास कधी संपणार? येणाऱ्या काळात उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्यावर ग्रामीण भागातील चित्र वेगळे असेल.

या गाव, तांड्यांना टंचाईच्या झळा

दरवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी तालुक्यात कोट्यवधींचा निधी पाण्यासारखा खर्च केला जातो. त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. यंदाही तालुक्यातील बोरवाडी, जाकापूर, जाकापूर (रेल्वे) तांडा, जाकापूर तांडा, लामकाणी, लामकाणी तांडा, पोमनाळा, पोमनाळा तांडा, मालदरी, देवठाणा, देवठाणा तांडा, मसलगा, कासारपेठ तांडा, अम्रूनाईक तांडा, विष्णुनाईक तांडा, रामनगर तांडा अशा १६ गावे, वाड्या, तांड्यांत ग्रामस्थांना अधिक टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com