Water Scarcity : उन्हाची तीव्रता वाढली ; मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईचे विघ्न

Water Crisis : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मोखाडा तालुक्यात टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढू लागली आहे.
Water Crisis
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Palghar News : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मोखाडा तालुक्यात टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढू लागली आहे. अनेक गावपाड्यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

जलजीवन मिशनच्या योजनांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करूनही सरकारकडून टँकर उपलब्ध करण्यात येत नाही. त्यामुळे महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

दरवर्षी पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्याला भीषण पाणी टंचाई भेडसावते. त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा ही उपाययोजना राबवली जाते. टँकरमुक्त गावपाडे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘जलजीवन मिशन’ ही योजना आणली.

Water Crisis
Water Scarcity: जल स्वयंपूर्ण गावांचा आराखडा: पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण भागात नवीन दिशा

मात्र, तालुक्यातील बहुतांश गावपाड्यांत ही योजना पोहोचलेलीच नाही. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, टंचाईग्रस्त गावपाड्यांतील नागरिकांना पाणी टंचाईने ग्रासले आहे.

सद्यःस्थितीत मोखाडा तालुक्यातील गोळीचा पाडा, धामोडी, चास-हट्टीपाडा, किनिस्ते-गवरचरी पाडा, ठाकूपाडा, नाशेरा-हनुमान टेकडी, आसे-वारघडपाडा आणि मडक्याची मेट या टंचाईग्रस्त आठ गावपाड्यांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Water Crisis
Water Scarcity : फेब्रुवारी महिन्यात काही भागांत पाणीटंचाई

हंडाभर पाण्यासाठी पायपीट

तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील हट्टीपाडा, जांभुळवाडी, गोमघर ग्रामपंचायतीच्या वाघवाडी आणि गोमघर, तर पाथर्डी ग्रामपंचायतीमधील डोंगरवाडी व हेदवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामपंचायतीने १० फेब्रुवारीला टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस उलटूनही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागत आहे

तालुक्यातील नळयोजना पूर्ण करून टँकरमुक्त तालुका करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले आहेत. मात्र अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने तेथे टँकरचे पाणी देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी टँकरची मागणी आहे. तेथील पाहणी करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.
- अक्षय पगार, गटविकास अधिकारी, मोखाडा
जलजीवन मिशनचे काम अपूर्णावस्थेत आहेत. अनेक गावपाड्यांत जलवाहिनी टाकलेली नाही. गोमघर आणि वाघवाडीच्या विहिरी आटल्या आहेत. टँकरची मागणी करून दहा दिवस उलटले, तरी अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली नाही. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे महिलांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
- सुलोचना गारे, सरपंच, गोमघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com