Krishna River : सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

Monsoon Rain : गेल्या चोवीस तासांत २१.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मात्र, धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
Krishna Flood
Krishna Floodagrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात पाऊस कमीअधिक प्रमाणात सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांत २१.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मात्र, धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातील कर्नाळ रोडवरील आरवडे पार्क येथील तीन कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांपर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी, अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी सुरू आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Krishna Flood
Maharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून सांगली येथील आयर्विन पूल सांगली २९.६ (४०) फूट तर अंकली पूल हरिपूर येथे पाणीपातळी ३३.७ (४५.११) फूट आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन सांगली महानगरपालिकेने पूर पट्ट्यातील वस्त्यांमध्ये जागृती सुरू केली आहे. सध्या सांगली महापालिका क्षेत्रातील कर्नाळ रोडवरील आरवडे पार्क येथील तीन कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

Krishna Flood
Heavy Rain : मुसळधारेने धरणांच्या साठ्यात वाढ

दरम्यान, दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ, खानापूर आणि जत या भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस उपयुक्त आहे.

विविध धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात साठवण क्षमता)

धरण पाणीसाठा

कोयना ६८.८३ (१०५.२५)

धोम ७.२४ (१३.५०)

कन्हेर ६.७५ (१०.१०)

वारणा २९.२८ (३४.४०)

दूधगंगा १७.६७ (२५.४०)

राधानगरी ७.७१ (८.३६)

तुळशी २.७६ (३.४७)

कासारी २.०४ (२.७७)

पाटगाव ३.३२ (३.७२)

धोम बलकवडी २.२९ (४.०८)

उरमोडी ४.६० (९.९७)

तारळी ३.९३ (५.८५)

अलमट्टी ९१.८३ (१२३)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com