Ragi Nutrition: खनिजांनी समृद्ध नाचणी

Ragi Benefits: नाचणी ही कॅल्शिअम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून हृदय, हाडे आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ती मधुमेह व आरोग्यसाठी उत्तम पर्याय आहे.
Ragi
Ragi Agrowon
Published on
Updated on

श्रीकृष्ण नरळे, डॉ. प्रकाश लोखंडे

Healthy Millet : लोह, कॅल्शिअम, तंतुमय घटक आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत असलेली नाचणी मधुमेह नियंत्रण, हृदयाचे आरोग्य, हाडांची मजबुती आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. नाचणीपासून विविध पदार्थ तयार करता येतात

नाचणी ही लोह, कॅल्शिअम आणि तंतुमय घटकांनी समृद्ध आहे. यामध्ये ९.८ टक्के प्रथिने, ८१.५ टक्के कार्बोहायड्रेट्स आणि ४.३ टक्के तंतुमय घटक आहेत. गव्हाच्या तुलनेत यामध्ये जास्त खनिजे असतात.

नाचणी ग्लुटेनमुक्त असल्यामुळे ग्लुटेन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे. नियमित सेवन केल्यास हाडे बळकट हातात. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहींसाठी लाभदायक आहे.

आरोग्यदायी फायदे

भरपूर कॅल्शिअम आणि फॉस्फरस असून हाडांचे आरोग्य सुधारते. ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांना प्रतिबंध करते.कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. टाइप-२ मधुमेहासाठी फायदेशीर ठरते.

नाचणीतील टॅनिन आणि पॉलिफेनॉल्स कॅन्सर होण्याचा धोका कमी करू शकतात.

तंतुमय घटकांनी समृद्ध असल्यामुळे पचनसंस्थेला मदत होते. बद्धकोष्ठता होत नाही.

Ragi
Ragi Crop : पावसाने नाचणीला पिकास फटका; उत्पादनावर परिणाम होण्याची शेतकऱ्यांना भिती

लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, अशक्तपणा दूर होतो.

तंतुमय घटक असल्याने नाचणी खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. अनावश्यक खाणे टाळले जाते.

अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो आम्ल असतात, जे कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात.

ग्लुटेन अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी नाचणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

पोषणमूल्ये (प्रति १०० ग्रॅम)

घटक प्रमाण

ऊर्जा ३३६ किलो कॅलरी

कार्बोहायड्रेट्स ८१.५ ग्रॅम

प्रथिने ९.८ ग्रॅम

मेद (फॅट) १.५ ग्रॅम

तंतुमय पदार्थ (फायबर) ३.६ ग्रॅम

कॅल्शिअम ३४४ मिलिग्रॅम

लोह ३.९ मिलिग्रॅम

फॉस्फरस २८३ मिलिग्रॅम

मॅग्नेशिअम १३७ मिलिग्रॅम

पोटॅशिअम ४०८ मिलिग्रॅम

(संदर्भ : भारतीय आहारतज्ज्ञ संशोधन संस्था)

अँटिऑक्सिडंट्स, औषधी गुणधर्म

नाचणीमध्ये टॅनिन, फायटेट आणि सॅपोनीन यासारखे घटक असतात. टॅनिन हा अँटिऑक्सिडंट असून हृदयविकार टाळण्यास मदत करतो.

फायटेट जास्त प्रमाणात असल्यास खनिजांचे शोषण कमी होते, परंतु योग्य प्रकारे प्रक्रिया केल्यास ते नियंत्रित करता येते. यातील घटक मधुमेहाच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी मदत करतात.

Ragi
Ragi Cultivation : नाचणी लागवडीस सिंधुदुर्गात प्रारंभ

मूल्यवर्धित पदार्थ

अन्नपदार्थ मुख्य घटक आरोग्यदायी फायदे

चपाती (रोटी) नाचणी पीठ, गव्हाचे पीठ, मीठ, पाणी प्रथिनयुक्त, मधुमेहींसाठी उपयुक्त.

डोसा नाचणी पीठ, उडीद डाळ, तांदूळ ग्लुटेन फ्री, प्रथिनयुक्त.

इडली नाचणी पीठ, उडीद डाळ, तांदूळ कॅल्शिअम आणि तंतुमय घटकांनीयुक्त

नाचणी पापड नाचणी पीठ, तांदूळ पीठ,

हरभरा पीठ, मीठ, मसाले दीर्घकाळ टिकवणक्षमता.

लाडू नाचणी पीठ, गूळ, तूप, ड्रायफ्रूट्स हाडांसाठी लाभदायक, ऊर्जा वाढविणारा

शिरा नाचणी पीठ, दूध, तूप, साखर,

सुका मेवा वजन वाढवण्यासाठी उपयुक्त.

खीर नाचणी पीठ, दूध, गूळ, सुका मेवा लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी पोषक.

चिवडा नाचणी दाणे, मसाले, शेंगदाणे, सुके खोबरे तंतुमय, पचनास मदत करणारा.

कुकीज, बिस्किटे नाचणी पीठ, लोणी, साखर / गूळ मधुमेहींसाठी फायदेशीर

आंबील, मिल्कशेक, नाचणी पीठ, दूध, फळे, मध थंडावा देणारे, हाडांसाठी उपयुक्त.

नाचणीतील महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट्स

अँटिऑक्सिडंट घटक कार्यप्रणाली आणि फायदे

पॉलिफेनॉल्स पेशींचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतात, हृदयविकाराचा धोका कमी होतो.

टॅनिन अँटिऑक्सिडंट आणि अँटी-कॅन्सर गुणधर्म, कोलेस्टेरॉल नियंत्रण.

फायटिक अॅसिड मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त, हाडांसाठी चांगले.

फ्लेव्होनॉइड्स हृदय आणि यकृताच्या आरोग्यास मदत.

फेर्युलिक अॅसिड त्वचा आणि मेंदूचे आरोग्य सुधारते.

- श्रीकृष्ण नरळे ९१४६९७६०९८ (जैवरसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com