Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Amit Shah : महाविकास आघाडी सरकारने रोकलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित केली जाईल. मराठवाड्यातील प्रत्येक शेतामध्ये पाणी पोहोचवले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.
Marathwada Water Grid Project
Marathwada Water Grid ProjectAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार असून महायुतीचेच सरकार येईल. महाविकास आघाडी सरकारने रोकलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित केली जाईल. मराठवाड्यातील प्रत्येक शेतामध्ये पाणी पोहोचवले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

जिंतूर विधासभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. १३) सायंकाळी आयोजित जाहीर सभेत शहा बोलत होते. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, हरिभाऊ लहाने, सुरेश भूमरे आदी उपस्थित होते.

Marathwada Water Grid Project
Marathwada Water Issue : कशी भागेल मराठवाड्याची तहान?

श्री. शहा म्हणाले, ‘‘राहुल गांधीच काय त्यांची चौथी पिढीदेखील कलम ३७० परत आणू शकत नाही. प्रत्येक निवडणुकीत राहुल बाबा नावाचे विमान लॅन्ड करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ते क्रॅश होते. महाराष्ट्रातही क्रॅश होणार आहे.

Marathwada Water Grid Project
Water Grid Scheme : वॉटर ग्रीड योजनेला २७४ कोटी मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित आणि समृद्ध करण्याचे काम केले. मनमोहन सिंह यांनी देश ११ व्या स्थानावर सोडला होता. मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देश ५ व्या स्थानावर आला आहे. मोदी प्रत्येक आश्वासन पूर्ण करतात. मोंदीनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.

महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करू. किसान सन्मान अंतर्गत १५ हजार रुपये देऊ, हमीभाव तसेच २० टक्के अधिक भावांतर योजना राबवू, सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव देऊ, रास्तभाव धान्य दुकांनावर गहू, तांदळाबरबरच मिरची, जिरे आदी जिन्नस देऊ, असे शहा म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com