Water Grid Scheme : वॉटर ग्रीड योजनेला २७४ कोटी मंजूर

८५ गाव पाणीपुरवठा योजनेला अर्थात वॉटर ग्रीड योजनेला अखेर केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत मंजुरी मिळाली आहे.
Water Grid Scheme
Water Grid Scheme Agrowon

धुळे : ८५ गाव पाणीपुरवठा योजनेला (Water Supply Scheme) अर्थात वॉटर ग्रीड योजनेला (Water Grid Scheme) अखेर केंद्र सरकारच्या जल जीवन मिशनअंतर्गत (Jal Jeevan Mission) मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी २७४ कोटी १९ लाख ४४ हजारांचा निधी मंजूर झाला आहे, या प्रक्रियेमुळे आता दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईशी (Water Shortage) सामना करणारी गावे आता कायमस्वरूपी टंचाईमुक्त होतील, असा विश्‍वास माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

Water Grid Scheme
Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना प्रकरणात झेडपी अध्यक्ष, ‘सीईओं’ना नोटीस

आमदार रावल म्हणाले, मराठवाडा ग्रीड योजनेच्या धर्तीवर शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी ही योजना मी मंत्री असतानाच्या काळात प्रस्तावित केली होती. नंतर सत्तांतरामुळे ही योजना मागे पडली. परंतु, केंद्र सरकारने जल जीवन मिशन हाती घेतल्याने त्यात शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावे ग्रीड योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. त्यानुसार २७४ कोटींचा निधी मंजूर झाला. या योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्र सरकारने जल जीवन मिशनमधून या योजनेला निधी देण्याबाबत तयारी दर्शविली. यात समावेशासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे सतत आग्रही पाठपुरावा केला, असे रावल म्हणाले.

Water Grid Scheme
Water Management : जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर

दर दिवशी पाणीपुरवठा

तालुक्यातील ८५ गावे ग्रीड योजनेसाठी तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजजवळ मोठे पंप हाऊस तयार होईल. तेथून क्रांती स्मारकाशेजारी दीडशे मीटर उंचीवरील डोंगरावर पाणी आणले जाईल. या ठिकाणी मोठे फिल्टर प्लांट तयार केले जाईल.

या गावांना मिळेल लाभ...

शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावे वॉटर ग्रीड योजनेंतर्गत चांदगड, डांगुर्णे, सोंडले, खलाणे, धांदरणे, डाबली, होळ, दसवेल, टेंभलाय, निरगुडी, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे, अंजदे, पिंप्राड, निसाणे, म्हाळपूर, बाभुळदे, चिरणे, कदाणे, वाघाडी खु, वाघाडी बु., कंचनपूर, बाभळे, कलमाडी, माळीस, वाघोदे, जातोडे, मेलाणे, गोराणे, विटाई, पिंपरखेडा, सार्वे, वायपूर, रोहाणे, दराणे, तामथरे, सवाईमुकटी, चिमठावड अमराळे, जखाणे, चिमठाणे, पिंप्री, दलवाडे प्र. सो., आरावे, शेवाळे, वाडी, दरखेडा, अलाणे, परसामळ- कुमरेज, साळवे, सोनशेलू, हातनूर, भडणे, वरूळ-घुसरे, चौगांव बु, चौगांव खु, दलवाडे प्र. नं., जोगशेलू, वरझडी, मेथी, कामपूर, विखरण, रहिमपुरे, विखुर्ले, अंजनविहीरे, खर्दे, मांडळ, देगांव, सतारे, देवी, रेवाडी, परसुले, कर्ले, देवकानगर, अक्क्लकोस, सुराय, चुडाणे, कलवाडे, मालपूर, धावडे, झिरवे, रामी, पथारे आदी गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com