Cereal Crops : भरडधान्य पिकांचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे

Grains Council : भरडधान्य पिकांचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे असून भरडधान्य पीक विकसित करण्यासाठी एक वर्ष काम न करता कमीत कमी दहा वर्षांसाठी आराखडा बनवण्यात यावा.
Grains Council
Grains CouncilAgrowon

Nanded News : मराठवाड्यातील भरडधान्य पिकाचे विशेषतः ज्वारी व बाजरी पिकाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी विविध तज्ज्ञांनी, भरडधान्य पिकांचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे असून भरडधान्य पीक विकसित करण्यासाठी एक वर्ष काम न करता कमीत कमी दहा वर्षांसाठी आराखडा बनवण्यात यावा, असा सूर या वेळी व्यक्त केला.

संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विभाग नांदेड, आरआरए नेटवर्क महाराष्ट्र, रिलायन्स फाउंडेशन, दिलासा जनविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड कापूस संशोधन केंद्र येथे एक दिवसीय भरडधान्य परिषदेचे आयोजन शनिवारी (ता. ११) करण्यात आले होते.

Grains Council
Nutritious Cereals : पौष्टिक तृणधान्याचा वारसा

या वेळी तज्ज्ञांनी चर्चेत सहभाग घेत मत व्यक्त केले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. तर प्रमुख पाहुणे अटारी पुणे संचालक डॉ. एस. के. रॉय, संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व अफार्म पुणे चेअरमन प्रमोद देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील संचालक शिक्षण डॉ. यू. एम. खोडके,

संचालक संशोधन डॉ. खजिर बेग, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एन. गोखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून बारा कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, निवडक शेतकरी व महिला व भरडधान्य प्रक्रिया उद्योजक उपस्थित होते.

मराठवाड्यातील ज्वारी व बाजरी ही प्रमुख भरडधान्य पिके आहेत. मागील काही वर्षांपासून ज्वारी व बाजरी पिकांच्या लागवड क्षेत्रात घट होत आहे. पिकाचे पेरणी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तसेच त्याचा आहारामध्ये वापरही अल्प प्रमाणात होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. या दोन दिवसीय परिषदेमध्ये ज्वारी व बाजरी पिकाच्या पुनरुज्जीवनासाठी, सुधारित वाणांचा वापर, ज्वारी काढणी व प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकारणाचा वापर, भरडधान्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भरडधान्य पिकातील विविध समस्या, आंतरपीक व मिश्रपीक पद्धतीचा वापर, प्रक्रिया उद्योग चालना व आहारातील समावेश वाढ आदी विविध विषयांवर चर्चासत्र झाली.

Grains Council
Cereal Farming : पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढावे

या परिषदेमध्ये डॉ. परशुराम पत्रोलटी, प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्थेअंतर्गत ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर, ज्वारी संशोधन केंद्र परभणीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. एन. जावळे, बायफ संस्थेकडून संजय पाटील, भरडधान्य प्रक्रिया उद्योजक एस. एस., भवानी फूड्स हैदराबादकडून वीरशेट्टी पाटील, मिलेट मॅन ऑफ तेलंगणा, कळसुबाई शेतकरी उत्पादक कंपनी नाशिककडून नीलिमा जोरवार, ॲग्रो झी ऑरगॅनिककडून महेश लोंढे आदी उद्योजकांनी अनुभव कथन केले.

भरडधान्य पिकाचा विकास आराखडा तयार होणार

उपस्थित तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पुढील वर्षभरासाठी मराठवाड्यासाठी भरडधान्य पिकाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याच प्रामुख्याने उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योजकाला चालना, मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती व विक्री व भरडधान्याचा आहारातील वापर वाढवणे, भरडधान्य पिकाचा जनावरांच्या चारा व इंधन म्हणून वापर इत्यादी बाबींना चालना देण्याचे ठरले.

त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विकसित ज्वारी वाण परभणी शक्ती व बाजरी वाण एएचबी १२६९ या बायोफोर्टीफाईड वाणाचे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक राबवणे, मजूर टंचाईवर मात करण्यासाठी ज्वारी व बाजरी कापणी यंत्र विकसित करणे, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बीज उत्पादन कार्यक्रम व प्रक्रिया उद्योजकाला चालना देणे,

शासनाकडे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून रेशन दुकानातून कमीत कमी ५० टक्के भरडधान्याच्या पुरवठ्यासाठी शासनाकडे शिफारस करणे व भरडधान्य पीक विकसित करण्यासाठी एक वर्ष काम न करता कमीत कमी दहा वर्षांसाठी आराखडा बनवण्यात यावा. या परिषदेच्या शिफारशींच्या आधारावर मराठवाड्यातील भरडधान्य पिके पुनरुज्जीवित करण्यासाठी आराखडा बनवण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com