Onion Sale : ‘बफर स्टॉक’मधील कांद्याची किरकोळ विक्री सुरू

Onion Buffer Stock : केंद्र सरकारच्या भावस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत पावणेपाच लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण झाल्यानंतर त्याचा साठा करण्यात आला होता. सध्या ग्राहकांकडून दरात ओरड नाही शिवाय शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक बाजारात सुरू आहे.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारच्या भावस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत पावणेपाच लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण झाल्यानंतर त्याचा साठा करण्यात आला होता. सध्या ग्राहकांकडून दरात ओरड नाही शिवाय शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक बाजारात सुरू आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून खरेदी केलेला हा कांदा बाजारात आणून दर नियंत्रणासाठी हस्तक्षेप करण्यात आला आहे. सध्या दिल्ली व मुंबईमध्ये किरकोळ विक्री सुरू झाली असून, किलोला ३५ रुपयांचा दर देण्यात आला आहे.

Onion
Attack on Onion Traders : नगरमध्ये कांदा व्यापाऱ्यावर हल्ला; लाखोंची रक्कम लुटली, दरोडेखोर फरार

कांद्याची खरेदी सुरू करताना केंद्र सरकारचे ग्राहक मंत्रालय शेतकऱ्यांसाठी ही खरेदी करत असल्याचे सांगत होते; तर आता शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असताना ग्राहकांना रास्त दरात मिळण्यासाठी बाजारात कांदा आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ) आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड), ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि केंद्रीय भंडार आणि सफलच्या आउटलेट्स आणि मोबाइल व्हॅनद्वारे किरकोळ विक्री सुरू करण्यात आली आहे.

Onion
Onion Buffer Stock : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या; कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी  नवी दिल्ली येथे विक्रीसाठी मोबाईल व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवून कांद्याच्या किरकोळ विक्रीचा प्रारंभ केला आहे. केंद्राने रब्बी हंगामातील ४.७ लाख टन कांद्याचा राखीव साठा करून ठेवला आहे. त्यानुसारच बाजारात पुरवठा सुरू झाला आहे. महागाई नसताना ती नियंत्रित करण्यासाठी सरकारने पुन्हा ग्राहक हिताचा विचार केला आहे. अन्नधान्य चलनफुगवट्याचा दर नियंत्रणात ठेवण्याला केंद्र सरकारचे प्राधान्य आहे, असे केंद्रीय मंत्री उघडपणे सांगत आहे.

४० केंद्रांवर किरकोळ विक्री सुरू

दिल्ली आणि मुंबईत ५ सप्टेंबरपासून ४० केंद्रांवर कांद्याची किरकोळ विक्री प्रक्रिया सुरू होत आहे. त्यानंतर पुढील आठवडाभरात कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, रायपूर आणि भुवनेश्वर या शहरांचा यात समावेश केला जाणार आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देशभरात ही प्रक्रिया राबवली जाईल. भारतातील इतर सहकारी संस्था आणि मोठ्या किरकोळ साखळ्या यांच्याशी संस्थेचे करार सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com